म्हणून नट्या करायच्या खलनायक म्हणून रंजीत यांच्या नावाची शिफारस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 14:41 IST2019-04-21T14:40:03+5:302019-04-21T14:41:09+5:30
‘द कपिल शर्मा शो’मध्ये रंजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार या बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या तीन खलनायकांनी हजेरी लावली आणि धम्माल झाली. या तिन्ही खलनायकांनी बॉलिवूडच्या प्रवासातील अनेक किस्से सांगितले.

म्हणून नट्या करायच्या खलनायक म्हणून रंजीत यांच्या नावाची शिफारस!
ठळक मुद्दे माझ्या आयुष्यात सुनील दत्त यांचे खूप मोठ योगदान आहे. त्यांनीच माझे गोपाळ हे खरे नाव बदलून मला रंजीत हे नवे नाव दिले, असेही रंजीत यांनी सांगितले.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये रंजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार या बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या तीन खलनायकांनी हजेरी लावली आणि धम्माल झाली. या तिन्ही खलनायकांनी बॉलिवूडच्या प्रवासातील अनेक किस्से सांगितले. पडद्यावर आम्ही खलनायक साकारत असलो तरी आयुष्यात आम्ही अतिशय सभ्य, सुसंस्कृत आहोत, हेही सांगायला ते विसरले नाहीत. बॉलिवूडच्या सुमारे ४०० चित्रपटांत खलनायक साकारणारे रंजीत यांनी तर यावर विशेष जोर दिला.
‘मी चारशेवर चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या. जगातील सगळी व्यसनं असलेला, दारू पिणारा, सिगारेट ओढणारा असा खलनायक मी पडद्यावर जिवंत केला. पण खºया आयुष्यात मी यापैकी काहीही करत नाही. दारू, सिगारेट यांना मी आयुष्यात कधीही हात लावलेला नाही. मी पूर्णपणे शाकाहारी आहे. बॉलिवूडच्या अनेक नट्या खलनायक म्हणून माझ्या नावाची शिफारस करायच्या. कारण मी पडद्यावर जरी खलनायक असलो तरी खºया आयुष्यात अतिशय सभ्य व्यक्ती आहे, हे त्यांना ठाऊक होते. माझ्यासोबत काम करताना त्यांना सुरक्षित वाटायचे, असेही रंजीत यांनी सांगितले.
माझ्या आयुष्यात सुनील दत्त यांचे खूप मोठ योगदान आहे. त्यांनीच माझे गोपाळ हे खरे नाव बदलून मला रंजीत हे नवे नाव दिले. माझे नाव खूप कॉमन आहे म्हणून त्यांनी ते बदलून टाकले, असेही रंजीत यांनी सांगितले.