Kapil Sharma : कपिल शर्मा आणि गिन्नीसोबत हनिमूनला गेले 37 जण; अभिनेत्याने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 14:38 IST2023-06-26T14:02:57+5:302023-06-26T14:38:57+5:30

Kapil Sharma : कपिल शर्माने हनीमूनशी संबंधित एक हैराण करणारा खुलासा केला आहे, ज्यावर सर्वच हसले.

Kapil Sharma reveled that he went for honeymoon with 37 other members | Kapil Sharma : कपिल शर्मा आणि गिन्नीसोबत हनिमूनला गेले 37 जण; अभिनेत्याने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा

फोटो - इंडिया.कॉम

'द कपिल शर्मा शो'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. सत्यप्रेममध्ये गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्यासह अनेक स्टार्स आहेत आणि जेव्हा हे सर्व स्टार्स कपिलच्या शोमध्ये आले तेव्हा त्यांनी खूप धमाल केली. आपल्या फनी स्टाईलसाठी ओळखला जाणारा कपिल यावेळी खूप बोलला.

कपिल शर्माने त्याच्या हनीमूनशी संबंधित एक हैराण करणारा खुलासा केला आहे, ज्यावर सर्वच हसले. कपिलला भेटल्यानंतर गजराजने त्याच्या परदेशी स्टेज शोवर भाष्य केलं. गजराज म्हणाला, तू तुझ्या शोसाठी अमेरिकेला जात आहेस, त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही कलाकारांनाही तिथे बोलावावं असं वाटत नाही. यावर सगळेच हसले आणि सुप्रिया पाठक यांनी याचं खरं कारण सांगितलं.

सुप्रियाने सांगितले की, गजराज चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परदेशात कोणी बोलावेल याची आतुरतेने वाट पाहत आहे. यावर कपिलला त्याचा हनीमून आठवला. त्याने सांगितले की, हनिमून ट्रिपला त्याच्या आणि गिन्नीसोबत आणखी 35 लोक होते. कपिल म्हणाला, मी मस्करी करत नाही. 25 डिसेंबरला आमचे रिसेप्शन होते आणि त्यानंतर गिनीची बहीण आणि तिची सासू आणि माझ्या बहिणी आणि आई आम्ही सगळे मिळून हनिमूनसाठी इटलीला गेलो होतो. आम्ही एकूण 37 जण होतो. आम्ही इटलीहून मुंबईला परतलो तेव्हा टेक्निकली आमचा हनिमून सुरू झाला.

गिन्नी चतरथ आणि कपिल कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते, पण कपिल आणि गिन्नी इच्छा असूनही एकत्र राहू शकले नाहीत. शेवटी गिन्नीच्या कुटुंबीयांनी होकार दिला आणि 2018 मध्ये दोघांचं लग्न झाले आणि लग्नानंतर अनायरा शर्माचा जन्म 2019 मध्ये झाला आणि मुलगा त्रिशानचा जन्म 2021 मध्ये झाला. आता त्याला दोन मुलं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Kapil Sharma reveled that he went for honeymoon with 37 other members