कपिल शर्माची मुलगी अनायराचा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड, हनी सिंगच्या गाण्यावर करतेय डान्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 12:21 IST2021-03-04T11:56:17+5:302021-03-04T12:21:20+5:30
Kapil Sharma Daughter anayra dances video : कपिल शर्मा अनेकदा आपल्या मुलीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

कपिल शर्माची मुलगी अनायराचा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड, हनी सिंगच्या गाण्यावर करतेय डान्स...
कपिल शर्माची मुलगी अनायरा एक क्युट व्हिडिओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे, ज्यामध्ये ती यो यो हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
कपिल शर्मा अनेकदा आपल्या मुलीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कपिलने मुलीचा हा लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनायरा रॅपर यो यो हनी सिंगचे गाणं 'जिंगल बेल्स'वर डान्स करताना दिसते आहे. ही आहे आमची छोटीशी रॉकस्टार यो यो हनी सिंगच्या 'जिंगल बेल्स'वर डान्स करताना.
कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या कार्यक्रमाचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतात. कपिलची मुलगी अनायरा नुकतीच 10 डिसेंबरला एक वर्षांची झाली आहे.
12 डिसेंबर 2018 रोजी कपिलने गिन्नी चतरथशी लग्न केले. लग्नाच्या एक वर्षानंतर, 2019 मध्ये कपिल पिता झाला आणि गिन्नीने अनयाराला जन्म दिला. अलीकडेच कपिल पुन्हा एकदा वडील झाला आहे आणि यावेळी त्यांना एक मुलगा आहे. कपिल शर्माने वडील होण्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती.