बाप रे बाप! वीकेंडच्या एका एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो तब्बल इतकं मानधन, जगतो इतके आलिशान आयुष्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 16:20 IST2020-11-21T16:20:27+5:302020-11-21T16:20:48+5:30
कपिल शर्माचे आज कोट्यवधी चाहते आहेत.

बाप रे बाप! वीकेंडच्या एका एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो तब्बल इतकं मानधन, जगतो इतके आलिशान आयुष्य...
कपिल शर्माचे आज कोट्यवधी चाहते आहेत. लोक त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. बॉलिवूडचे दोन सिनेमे त्याच्या नावावर आहेत. पण इथवर पोहोचण्यासाठी कपिलने अपार कष्ट घेतले आहेत. कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षकांना हसवतात आणि त्यांच्या विनोदी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
द कपिल शर्माचे होस्ट करणारा आणि आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी लोकांचे मनोरंजन करणारा कपिल शर्मा शोच्या पहिल्या सीजनमध्ये वीकेंड एपिसोडसाठी 60 ते 70 लाख लाखांचे मानधन घ्यायचा. पण आता तो प्रत्येक वीकेंडच्या एपिसोडसाठी एक कोटी रुपये घेतो. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने मानधनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
कपिल मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या वर्षात कपिलने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला पण संघर्ष सुरुच होता. 2007 साली कपिल ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. यानंतर कपिलने अनेक शो केले़ अनेक अवार्ड शो होस्ट केलेत. पण हार मानली नाही. 2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले.
कपिलकडे मुंबईमध्ये एक खूप महागडा फ्लॅट आहे. त्याची किंमत 15 कोटी रुपये इतकी आहे. कपिलकडे लग्जरी मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत 1.19 कोटी रुपये आहे. - मर्सिडीजव्यतिरिक्त त्याच्याकडे Volvo XC सुद्धा आहे. त्याच्या कारची किंमत 90 ते 1.3 कोटींच्या जवळ जवळ आहे. - पंजाबमध्ये कपिल शर्माकडे एक प्रशस्त बंगला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा आहेत. या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. लवकरच कपिल दुसऱ्यांदा बाबा होणार आहे अशी माहिती आहे.