कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:06 IST2025-07-11T13:06:24+5:302025-07-11T13:06:54+5:30
नुकतंच कॅफेवर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर कपिल शर्माला आणखी एक धक्का मिळाला आहे. काय घडलं नेमकं?

कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?
कपिल शर्मा सध्या चांगलाच काळजीत आहे. कपिलच्या कॅनडातील 'कॅप्स कॅफे'वर गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे कपिल शर्मा आणि त्याच्या टीमला मोठा धक्का बसला. कपिलने ही घटना घडल्यावर त्याचं म्हणणं सुद्धा व्यक्त केलं. आता या घटनेनंतर कपिल शर्माच्या आयुष्यात आणखी एक वाईट गोष्ट घडली आहे. त्यामुळे त्याला नक्कीच फटका बसणार यात शंका नाही, काय झालंय नेमकं? जाणून घ्या
कपिल शर्माला मोठा फटका
कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' या शोचा तिसरा सीझन सुरु झालाय. या शोची ग्रँड सुरुवात सलमान खानने केली. पहिल्याच एपिसोडला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. परंतु त्यानंतर मात्र 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' मध्ये व्ह्यूवरशीपवर मोठा परिणाम झाला. नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या प्रेक्षकसंख्येवर चांगलाच परिणाम झाला. हा शो जगभरातील नॉन-इंग्रजी शोध्ये सातव्या स्थानावर खाली गेला आहे. प्रेक्षकसंख्या घटल्याने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या चौथ्या सीझन येणार की नाही, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
व्ह्यूजबद्दल सांगायचं तर, 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या तिसऱ्या सीझनचा पहिल्या एपिसोडला १.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या एपिसोडची प्रेक्षकसंख्या कमालीची कमी झाली आहे. या एपिसोड्सला अनुक्रमे १६ लाख आणि १९ लाख इतके व्ह्यूज मिळाले आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या आजवरच्या एपिसोडच्या तुलनेत हे फार कमी व्ह्यूज आहेत, असं बोललं जातंय. त्यामुळे कॅप्स कॅफेवर झालेला हल्ला त्यात 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'च्या व्ह्यूअरशिपवर परिणाम, अशा गोष्टींमुळे कपिल सध्या चिंताग्रस्त आहे