मुंबईत ‘या’ दिवशी होणार कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 15:40 IST2018-12-21T15:40:31+5:302018-12-21T15:40:58+5:30

छोट्या पडद्यावरचा ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माने गत १२ डिसेंबरला  गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली.  ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचलेत.

Kapil Sharma and Ginni Chatrath to have a lavish reception in Mumbai | मुंबईत ‘या’ दिवशी होणार कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन!

मुंबईत ‘या’ दिवशी होणार कपिल शर्माचे वेडिंग रिसेप्शन!

ठळक मुद्देअतिशय थाटामाटात पार पडलेल्या या लग्नानंतर १४ डिसेंबरला कपिल व गिन्नीचे पहिले वेडिंग रिसेप्शनही पार पडले. या रिसेप्शनला कपिलचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होते. यानंतर येत्या २४ डिसेंबरला कपिल-गिन्नी दुसरे ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत.

छोट्या पडद्यावरचा ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माने गत १२ डिसेंबरला  गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली.  ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचलेत. अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या लग्नानंतर १४ डिसेंबरला कपिल व गिन्नीचे पहिले वेडिंग रिसेप्शनही पार पडले. या रिसेप्शनला कपिलचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होते. यानंतर येत्या २४ डिसेंबरला कपिल-गिन्नी दुसरे ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात होऊ घातलेल्या या रिसेप्शनसाठी टीव्ही व बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. सध्या कपिलचे रिसेप्शन कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.


 कपिल शर्मा लवकरच टीव्हीवर कमबॅक करतोय. मुंबईतील ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शननंतर कपिलच्या शोचा पहिला एपिसोड आॅन एअर होईल. या  
पहिल्या एपिसोडचा प्रोमोही रिलीज झाला आहे. ‘द कपिल शर्मा शो सिझन 2’ च्या पहिल्या भागात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हजेरी लावणार आहे. त्याचसोबत त्याचे भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि वडील सलीम खानही या कार्यक्रमात दिसणार आहेत. याशिवाय या भागात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि सारा अली खान यांना देखील पाहायला मिळणार आहेत. ते दोघे ‘सिम्बा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतील. ‘द कपिल शर्मा शो सिझन 2’यंदाच्या सिझनमध्ये  अनेक नवे चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. भारती सिंग, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, सुदेश लहरी, रोशेल राव यांसारखे अनेक हास्यकलाकार या सिझनमध्ये झळकणार आहेत. हा कार्यक्रम सलमान खान प्रोड्युस करत असून सोनी वाहिनीवर हा शो प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.  
 

Web Title: Kapil Sharma and Ginni Chatrath to have a lavish reception in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.