महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:44 IST2025-01-09T13:44:40+5:302025-01-09T13:44:56+5:30

अभिनेता नेहमीच आध्यात्मिक व्यक्ती होता, पण, व्यक्ती बदलतात, असं अभिनेत्रीनं म्हटलं आहे.

Kamya Punjabi Reveals Vivian Dsena Was A Devotee Of Mahadev Talked On His Conversion To Islam | महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा

महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा

Vivian Dsena Conversion To Islam : विवियन डिसेना (Vivian Dsena) हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं 'प्यार की ये एक कहानी', 'मधुबाला – एक इश्क एक जुनून' आणि 'शक्ती – अस्तित्व के एहसास की' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. त्याचा एक मोठा चाहता वर्ग आहे. काही काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर विवियन डिसेना याने लोकप्रिय टेलिव्हिजन रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. 'बिग बॉस १८'मध्ये एन्ट्री घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून विवियन चर्चेत आहे. नुकतंच 'शक्ती: अस्तित्व के अहसास की' या मालिकेतील सहकलाकार काम्या पंजाबी हिने 'बिग बॉस १८'मध्ये पोहचली होती. यावेळी तिनं अभिनेत्याबद्दल खुलासा केला. 

काम्या पंजाबी हिने अलिकडेच पार पडलेल्या 'बिग बॉस १८'च्या 'विकेंड का वार'ला सलमान खानसोबत स्टेज शेअर केलं. यावेळी तिनं विवियनला घरातील त्याचा खेळ सुधारण्याचा सल्ला दिला. तर काम्यानं 'टेली मसाला'शी संवाद साधताना विवियनला रिअ‍ॅलिटी चेक देण्यासाठी बिग बॉसनं मला बोलावल्याचं सांगितलं. यावेळी तिला विवियनच्या धर्मांतराबद्दल विचारण्यात आलं.  विवियन पूर्वीही असाच आध्यात्मिक होता का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली,  हो, तो विवियनची महादेवांवर खूप भक्ती होती. पण, हरकत नाही, माणसं बदलतात. मी सुद्धा प्रत्येक धर्माला मानते, मी स्वतः एक-दोन वेळा रोजे पाळले आहेत". 

 दरम्यान, स्पर्धक सारा अरफीन खानने बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सांगितले होते की, विवियन बिग बॉसच्या घरातही दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतो. विवियन डिसेना हा ख्रिश्चन होता. पण, २०१९ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला आणि २०२२ मध्ये त्याने इजिप्तमधील पत्रकार नूरन अलीशी लग्न केलं. जेव्हा विवियनने इस्लाम स्वीकारला, तेव्हा त्याच्या पत्नीवर लव्ह जिहादचा आरोप झाला होता. विवियन त्याची पहिली बायको अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात असताना नूरनची विवियनशी भेट झाली होती. नूरनदेखील घटस्फोटित आहे. तिला लैला आणि आलिया नावाच्या दोन मुली आहेत. एक १० आणि दुसरी आठ वर्षांची आहे. त्या बहरीनमध्ये शिकतात.

Web Title: Kamya Punjabi Reveals Vivian Dsena Was A Devotee Of Mahadev Talked On His Conversion To Islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.