काम्या पंजाबीचा झाला साखरपुडा, पाहा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 14:00 IST2020-02-09T14:00:00+5:302020-02-09T14:00:01+5:30

रोमॅन्टिक अंदाजात केले प्रपोज...

kamya punjabi and shalabh dang get engaged photos viral | काम्या पंजाबीचा झाला साखरपुडा, पाहा रोमॅन्टिक फोटो

काम्या पंजाबीचा झाला साखरपुडा, पाहा रोमॅन्टिक फोटो

ठळक मुद्दे2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते.

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी उद्या 10 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत काम्या लग्नगाठ बांधणार आहे. तत्पूर्वी काम्या व शलभचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत काम्याने क्रिम आणि लाईट ग्रीन कलरचा शरारा घातला होता.

शलभने काम्याला रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज केले. यावेळी काम्याच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

 काम्या सतत लग्नाबद्दलचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने बॅचलर पार्टी साजरी केली. या पार्टीचे काही फोटोही काम्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत काम्या तिच्या गर्लगँगसोबत मस्ती करताना दिसली होती.

  10 फेब्रुवारीला लग्न त्यानंतर 11 फेब्रुवारीला काम्या मित्र मंडळी आणि जवळच्या नातेवाईकासांठी एका ग्रँड पाटीर्चे आयोजनही करणार आहे.


 
कुटुंबाच्या सहमतीनेच लग्नाचा निर्णय घेतला असून आता आम्ही जास्त दिवस एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. त्यामुळे लग्न करत आयुष्याची सुंदर सुरूवात करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते.  

शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे. काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे.

2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते.  लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे. शलभचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे.

Web Title: kamya punjabi and shalabh dang get engaged photos viral