'कमळी'त रंगणार कबड्डीचा थरार, सत्य आणि आत्मसन्मानाची लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:54 IST2025-09-12T16:49:45+5:302025-09-12T16:54:00+5:30

'Kamal' serial : 'कमळी' मालिकेच्या कथानकात नाट्यमय वळण आलं आहे.

'Kamal' serial will feature the thrill of Kabaddi, a battle of truth and self-respect! | 'कमळी'त रंगणार कबड्डीचा थरार, सत्य आणि आत्मसन्मानाची लढाई!

'कमळी'त रंगणार कबड्डीचा थरार, सत्य आणि आत्मसन्मानाची लढाई!

झी मराठीवरील 'कमळी' मालिका प्रेक्षकांना दररोज नव्याने गुंतवून ठेवत आहे. एका सर्वसामान्य गावकरी मुलीचा संघर्ष, स्वतःवरचा अढळ विश्वास आणि आत्मसन्मान टिकवून ठेवण्याची तिची धडपड या सगळ्याचा वेध ही मालिका अत्यंत प्रभावीपणे घेत आहे. कमळीने तिच्या स्वभावाने सातत्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच कथानकात एक नाट्यमय वळण आलं आहे.

अनिकाच्या घरातील आरोप-प्रत्यारोपामुळे कमळीला घर सोडावं लागतं, आणि तिच्या या अवस्थेचा फायदा घेत अनिका तिची जाहीरपणे खिल्ली उडवते. अनिकाचा वाढता अहंकार कॉलेजच्या परिसरात स्पष्टपणे दिसून येतो. कॉलेजमध्ये आंतरराज्य कबड्डी स्पर्धेची घोषणा झालेय आणि ही स्पर्धा कमळीसाठी नव्या संधीचं दार उघडणारी ठरू शकते, असं वाटत असतानाच संघप्रमुख असलेली अनिका तिचा प्रवेश नाकारते. पण इथेच कबड्डीचे सर पुढे येतात. ते कमळीमधील शारीरिक आणि मानसिक ताकद ओळखून तिचं नाव पुढे करतात. मात्र प्राचार्यांच्या स्पष्ट सूचनेनुसार, अंतिम निर्णय अनिकाचाच असतो आणि ती आपली द्वेषभावना कायम ठेवते.

कमळीचा नवा गुरू तिचं आयुष्य कसं घडवणार?

या दरम्यान अनिकाच्या घरी काही महत्त्वाचे पुरावे सापडतात, जे अन्नपूर्णा आजीला कमळीबाबतचं सत्य दाखवून देतात. या घडामोडींमुळे आता अनिका कॉलेजमध्ये एका छोट्या कबड्डी सामन्यात प्लँनिंग करून कमळीला हरवणार आहे. तिच्या या खेळीमुळे कमळी अपमानित होते, पण तिचा आत्मविश्वास डगमगत नाही उलट तो अधिक ठाम होतो. कमळीची ही चिकाटी पाहून कबड्डी सर तिला योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगतात. आणि हाच क्षण ठरतो एका नव्या वळणाचा. एक नवा गुरू जो केवळ प्रशिक्षक नाही, तर कमळीच्या जिद्दीला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक ठरणार आहे. हा गुरू कमळीचा आत्मविश्वास पुन्हा जागवणार आहे. तिच्या क्षमतेला आकार देणार आहे आणि तिला कबड्डीच्या मैदानासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सज्ज करणार आहे. कमळीचा नवा गुरू तिचं आयुष्य कसं घडवणार? अनिका- कमळी यांच्यातील स्पर्धा कोणत्या टप्प्यावर जाऊन पोहोचणार?  हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: 'Kamal' serial will feature the thrill of Kabaddi, a battle of truth and self-respect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.