'# लय आवडतेस तू मला'मध्ये सरकार सानिकाच्या विरोधात उभं ठाकणार कळशीगाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:58 IST2025-02-19T18:57:42+5:302025-02-19T18:58:05+5:30
# Lai Aavdtes Tu Mala Serial : '# लय आवडतेस तू मला' मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यापासून सगळीच गणितं बदलली आहेत.

'# लय आवडतेस तू मला'मध्ये सरकार सानिकाच्या विरोधात उभं ठाकणार कळशीगाव
कलर्स मराठीवरील '# लय आवडतेस तू मला' मालिकेत (# Lai Aavdtes Tu Mala Serial) साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यापासून सगळीच गणितं बदलली आहेत. सरकार - सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती कशी लवकरात लवकर बरी होईल यासाठी प्रयत्नात आहेत. पण हे सगळं घडत असताना सरकार मात्र सानिकाची पुरेपूर काळजी घेतो आहे तिला त्या गावात, घरात एकटं वाटणार नाही. तो सानिकाला खुश ठेवण्याचे बरेच प्रयत्न देखील करत आहे.
साहेबरावांनी फॅक्टरी बंद केल्यानंतर कळशी गावातील गावकरी बेरोजगार झाले आहेत आणि त्यामुळे आता गावकऱ्यांना दोघेही गावात नकोसे झाले आहेत. संपूर्ण कळशीगाव सरकार सानिकाच्या विरोधात उभं ठाकलं आहे. सरकारच्या घरच्यांना धक्का बसतो जेव्हा सई कमलला सांगते पूर्ण गावानं कुटुंबाला वाळीत टाकलय. लाइट, पाणी, किराणा सगळ बंद केलंय. कमल सानिकाला दोषी ठरवते पण, या सगळ्यात सानिकाला मात्र सरकारची साथ आहे.
सरकारच्या घरात अजून सानिकाला सगळ्यांनी स्वीकारले नाही आहे. कमल अजूनही तिच्या विरोधात आहे आणि ते पण सईच्या बोलण्यात येऊन. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन साजरा करण्यासाठी बाबू आणि विभा सरकार सानिकाला गपचूप प्लॅन करून एका ठिकाणी घेऊन जाण्याचे ठरवतात. आता सईला हे कळताच व्हॅलेंटाइन डे बिघडवण्यासाठी सई काय डाव रचणार हे कळेलच. तर दुसरीकडे, गावाने वाळीत टाकले आहे हे सरकार सानिकाला कळल्यावर त्यांना खूप अस्वस्थ वाटते. दोघे घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करतात आणि मार्ग काढायच ठरवतात. गाववाले ऐकायला तयार नाहीत, त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. घरातील सून म्हणून सानिकाची जबाबदारी जरा वाढली आहे, आता ती हे कर्तव्य कशी पार पाडेल ? घरातल्या मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी सरकार - सानिका कोणता नवा मार्ग काढतील हे येत्या भागात समजेल.