टीआरपीचा फटका बसला! अवघ्या २ महिन्यांतच मालिकेने गाशा गुंडाळला, 'या' दिवशी प्रसारित होणार अंतिम भाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:04 IST2026-01-08T11:02:06+5:302026-01-08T11:04:32+5:30
प्रेक्षकांना धक्का!'कोण होतीस तू...' पाठोपाठ 'ही'लोकप्रिय मालिका होणार बंद; या दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

टीआरपीचा फटका बसला! अवघ्या २ महिन्यांतच मालिकेने गाशा गुंडाळला, 'या' दिवशी प्रसारित होणार अंतिम भाग
Television: छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते.त्यामुळे या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही प्रेक्षकांच्या भेटीला आली.या मालिकेबद्दल उत्सुकता असताना वाहिनीकडून आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली. ‘तुझ्या सोबतीने’असं या मालिकेचं नाव आहे. येत्या १९ जानेवारीपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.
एकीकडे नव्या मालिकांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असताना कोणती मालिका संपणार असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला होता.हे चित्र आता स्पष्ट झालं आहे.गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका ऑफ एअर झाल्यानंतर स्टार प्रवाहची आणखी एक सिरिअल बंद होणार आहे. ही मालिका म्हणजे 'काजळमाया' आहे. सोशल मिडियावर या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर २७ ऑक्टोबर २०२५ ला 'काजळमाया' ही थ्रिलर मालिका सुरु झाली. यामध्ये अभिनेता अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांची प्रमुख होती. रोज रात्री ११ वाजता ही मालिका प्रसारित व्हायची. लवकरच ही थ्रिलर मालिका बंद होणार आहे. याबद्दल वाहिनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यात ही मालिका संपल्याने प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसला आहे. येत्या ११ जानेवारीला काजळमाया मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होईल.
'काजळमाया' मध्ये प्रेक्षकांना चेटकीणीच्या वंशातील विलक्षण सुंदर असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळाली. हॉरर कथेचा अनुभव देणारी ही सिरिअल आता ऑफ एअर होणार आहे.