लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतरच काम्या पंजीबीचा फोटो पाहून संभ्रमात होते चाहते, वाचा नेमकं काय घडलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 11:54 IST2021-01-07T11:50:12+5:302021-01-07T11:54:23+5:30

काम्या पंजाबीही बिनधास्त आणि रोखठोक बोलणारी अभिनेत्री आहे. पतीसह काम्या दुबईमध्ये व्हॅकेशनसाठी गेली होती. तेव्हाही अशाच प्रकारे तिच्या एका फोटोमुळे वावड्या उठल्या होत्या.

Just a few months after wedding, Fans shocked to see a photo of Actress Kamya Panjibi, Know What Exactly Happened | लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतरच काम्या पंजीबीचा फोटो पाहून संभ्रमात होते चाहते, वाचा नेमकं काय घडलं होतं

लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतरच काम्या पंजीबीचा फोटो पाहून संभ्रमात होते चाहते, वाचा नेमकं काय घडलं होतं

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने गेल्याच वर्षी धुमधडाक्यात दुसरे लग्न करत तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली होती.  ८ फेब्रुवारीला साखरपुडा झाला होता त्यानंतर फेब्रुवारीतच दोघांचे धुमधडाक्यात लग्नही पार पडले होते. लग्नानंतर कपलने एक ग्रँड पार्टी दिली होती. त्यानंतर आणखी एक रिसेप्शनचे दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आले होते. 


शलभ डांगसह तिचे हे शुभ मंगल पार पडले होते. लग्नानंतर काम्या आणि शलभ यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. त्यामुळे लग्नानंतरचे त्यांचे आयुष्य जाणून घेण्यातही चाहत्यांना अधिक रस वाटतो. सोशल मीडियावर ती सतत तिच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते. सोशल मीडियावर या कपलच्या फोटोंना अधिक पसंतीही मिळते. 

सोशल मीडियावरच काम्याचा आणखी एक फोटो समोर आला आहे. या फोटोत तिचा अवतार पाहूनच तिच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा तर्क वितर्क लावायला सुरुवात केले होते. अनेकांना लग्नानंतर काम्याच्या आयुष्यात सुरळीत नसल्याचेही वाटले होते. मात्र तसे काही नसून तिचा हा फोटो तिच्या एका मालिकेतील भूमिकेचा लूक होता.

 

हा फोटो जेव्हा शेअर झाला तेव्हाच तुफान व्हायरल झाला होता. काम्याचा हा फोटो जुना असून तिच्या एका भूमिकेतला आहे. काम्या तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत असून काम आणि संसार दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखत तिच्या जबाबदा-याही पार पाडत आहे. त्यामुळे सगळे काही आल इज वेल आहे. 

शलभ दिल्लीचा राहणारा आहे जो हेल्थकेयेर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. काम्या सोशल मीडियावरदेखील शलभसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. फोटोंमध्ये दोघांचीही उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळते.

काम्याही बिनधास्त आणि रोखठोक बोलणारी अभिनेत्री आहे. पतीसह काम्या दुबईमध्ये व्हॅकेशनसाठी गेली होती. तेव्हाही अशाच प्रकारे तिच्या एका फोटोमुळे वावड्या उठल्या होत्या. काम्यानेच फोटो शेअर करून तिने म्हटले होते की, तिच्या शरीरावर दिसणारा प्रत्येक व्रण एक कहाणी सांगतो. काम्यानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझं शरीर एक कॅनव्हास प्रमाणे आहे.

ज्यावरील प्रत्येक व्रण मी किती धाडसी आहे आणि यासाठी मला काय किंमत चुकवावी लागली याची मला आठवण करुन देतो. मी ती प्रत्येक गोष्ट वेड्यासारखी लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकवेळी बदलणारं वजन जे कधी माझ्या मुलांमुळे तर कधी खाण्यामुळे वाढत होतं. पण आता मला माझ्या या कॅनव्हासवर अभिमान आहे आणि भविष्यात त्यावर तयार होणाऱ्या नव्या चित्राची प्रतीक्षा आहे.

Web Title: Just a few months after wedding, Fans shocked to see a photo of Actress Kamya Panjibi, Know What Exactly Happened