'जुनं फर्निचर'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये हजेरी, कलाकारांनी केली धमालमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 18:59 IST2024-05-02T18:58:51+5:302024-05-02T18:59:39+5:30

Hastay Na? Hasaylach Pahije! : 'हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!' शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली. त्यानंतर आता 'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या टीमने या शोमध्ये हजेरी लावली. त्याचा प्रोमो समोर आला आहे.

'Juna Furniture' team's will be seen in 'Hastay na? Hasaylach Pahije!' show, the actors had a blast | 'जुनं फर्निचर'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये हजेरी, कलाकारांनी केली धमालमस्ती

'जुनं फर्निचर'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये हजेरी, कलाकारांनी केली धमालमस्ती

अभिनेता निलेश साबळे(Nilesh Sable)चा कलर्स मराठी वाहिनीवर 'हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!' (Hastay Na? Hasaylach Pahije!) हा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या शोचे बरेच प्रोमो, व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. तेव्हापासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली. त्यानंतर आता 'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या टीमने या शोमध्ये हजेरी लावली. त्याचा प्रोमो समोर आला आहे.

हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे! या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या विनोदावर महेश मांजरेकरांसह जुनं फर्निचर चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर लोटपोट हसत आहेत. त्यामुळे एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हसताय ना? हसायलाच पाहिजे! या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत.  तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहता येईल.

Web Title: 'Juna Furniture' team's will be seen in 'Hastay na? Hasaylach Pahije!' show, the actors had a blast