'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; कौस्तुभच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:06 AM2024-04-19T11:06:03+5:302024-04-19T11:07:01+5:30

Kaustubh diwan: कौस्तुभने 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत आदित्य नगरकर ही भूमिका साकारली होती.

julun-yeti-reshimgathi-fame-kaustubh-diwan-married-with-kirti-kadam | 'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; कौस्तुभच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर

'जुळून येती रेशीमगाठी' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; कौस्तुभच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर

सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकार  लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. यामध्येच जुळून येती रेशीमगाठी या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सध्या या अभिनेत्याच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतली आदित्य नगरकर म्हणजेच अभिनेता कौस्तुभ दिवाण या अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. किर्ती कदम असं कौस्तुभच्या पत्नीचं नाव असून मोठ्या थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती.

कौस्तुभने आणि त्याच्या पत्नीने लग्नात मराठमोळ्या लूकला पसंती दिली होती. यावेळी कौस्तुभने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि केशरी रंगाचं धोतर  परिधान केलं होतं. तर त्याच्या पत्नीने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. मागच्या महिन्यात १८ मार्चला आस्ताद, स्वप्नाली, शिल्पा नवलकर आणि अन्य काही कलाकारांनी मिळून कौस्तुभ आणि किर्तीचं केळवण केलं होतं.

कौस्तुभच्या लग्नात कलाकारांची मांदियाळी

आस्ताद काळे, स्वप्नाली पाटील, मेघा धाडे, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे, अभिजीत केळकर यांसारखे अनेक कलाकार या लग्नाला उपस्थित होते.

दरम्यान, कौस्तुभने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘बंध रेशमाचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे!’, ‘तुजं माजं सपान’ यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला  आहे.

Web Title: julun-yeti-reshimgathi-fame-kaustubh-diwan-married-with-kirti-kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.