दिसायला नवरा असा पाहिजे असे सांगत जुई गडकरीने जिंकली चाहत्यांची मनं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 17:05 IST2021-04-16T17:01:37+5:302021-04-16T17:05:06+5:30
तुझा पार्टनर दिसायला कसा हवा असे एका फॅनने जुईला विचारले होते. यावर जुईने दिलेल्या उत्तरामुळे सध्या तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.

दिसायला नवरा असा पाहिजे असे सांगत जुई गडकरीने जिंकली चाहत्यांची मनं
जुई गडकरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी संवाद साधते. तिने इन्स्टाग्रामच्या 'AskMeAnything' या फिचरद्वारे नुकताच चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका फॅनने विचारलेल्या प्रश्नाला तिने दिलेल्या उत्तरामुळे सध्या तिचे चांगलेच कौतुक होत आहे.
तुझा पार्टनर दिसायला कसा हवा असे एका फॅनने जुईला विचारले होते. यावर जुईने दिलेल्या उत्तरामुळे सध्या तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. दिसणं महत्त्वाचं असतं का? पण जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर खरे प्रेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसे दिसता हे इतके महत्त्वाचे नसते.'
जुईला मांजराची प्रचंड आवड असल्याची सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच एखाद्या मुलाला मांजरीची आवड नसेल तर त्या मुलाशी लग्न करशील का असे विचारले त्यावर असा मुलगा मी शोधणारच नाही असे जुईने उत्तर दिले.
जुई गडकरी 'पुढचं पाऊल' मालिकेतील सोज्वळ सूनेच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. त्यानंतर ती 'सरस्वती' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. जवळपास ती दोन महिने बिग बॉसच्या घरात होती. या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती युरोप टूरवर मोठ्या कालावधीसाठी गेली होती. जुई गडकरीने बिग बॉसनंतर वर्तुळ या मालिकेत काम केले होते. जुई सोशल मीडियाद्वारे समाजातील प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते.