सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 06:30 IST2018-11-11T06:30:00+5:302018-11-11T06:30:01+5:30

अंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे.

Jugalbandi to play between Salman Khan and Ranveer Singh | सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी

सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस सीझन 12ला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. १२ सप्टेंबरला या शोला प्रारंभ झाला आणि आता अखेरचा एपिसोड ३० डिसेंबरला प्रसारीत होणार आहे. या शोच्या अंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस सीझन १२ च्या अंतिम सोहळ्यात रणवीर सिंग बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत एन्ट्री करणार आहे. अर्थात “बिग बॉस’मध्ये सलमान आणि रणवीर सिंग यांच्यातील जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच रोहित शेट्टीही या कार्यक्रमादरम्यान त्याच्या आगामी स्टंट शो “खतरो के खिलाडी’ याच्या नवव्या सीझनची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. हा शो पुढील वर्षी 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या लग्नाची बातमी नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना दिली आहे. १४ आणि १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे लग्न होणार आहे. त्यांचे लग्न इटली मध्ये होणार असून इटलीला जायला ते दोघे नुकतेच रवाना झाले आहेत. त्या दोघांना मुंबई एअरपोर्टवर पाहाण्यात आले.  त्यापूर्वी 13 तारखेला संगीत सेरिमनी आणि 1 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नानंतर रणवीर त्याच्या “सिम्बा’ चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. यात सारा अली खान मुख्य मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Jugalbandi to play between Salman Khan and Ranveer Singh