‘जज’ची खुर्ची जॅकलिनला भावली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:35 IST2016-08-12T08:05:58+5:302016-08-12T13:35:58+5:30
सिनेमा आणि टीव्ही मालिका यांत काहीही फरक नसतो हे मत आहे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं. तिच्यानुसार दोन्ही माध्यमं वेगवेगळी असली ...

‘जज’ची खुर्ची जॅकलिनला भावली !
स नेमा आणि टीव्ही मालिका यांत काहीही फरक नसतो हे मत आहे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं. तिच्यानुसार दोन्ही माध्यमं वेगवेगळी असली तरी त्यांचा उद्देश हा एकच असतो तो म्हणजे रसिकांचं मनोरंजन असं जॅकलिनला वाटतं. सध्या 'झलक दिखला जा' या रियालिटी शोच्या जजची खुर्ची ती बरीच एन्जॉय करतेय. हा अनुभव भविष्यातही कामी येणार असल्याचं तिचं म्हणणं आहे. टीव्ही इंडस्ट्रीतून आगामी काळात चांगल्या ऑफर्स आल्या तर त्याचा नक्की स्वीकार करेन असंही जॅकलिननं स्पष्ट केलंय.