जॉनी लिव्हर यांनी कपिल शर्माच्या साथीलादाराला दिला मदतीचा हात,पार्टनरच्या रूपात येणार समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 15:21 IST2017-09-29T09:51:24+5:302017-09-29T15:21:24+5:30
कुणी निंदा, कुणी वंदा, हसवणं हाच आमचा धंदा असं म्हणत जॉनी लिव्हर छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत. 'पार्टनर' नावाच्या ...

जॉनी लिव्हर यांनी कपिल शर्माच्या साथीलादाराला दिला मदतीचा हात,पार्टनरच्या रूपात येणार समोर
क णी निंदा, कुणी वंदा, हसवणं हाच आमचा धंदा असं म्हणत जॉनी लिव्हर छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत. 'पार्टनर' नावाच्या एका शोद्वारे जॉनी लिव्हर कॉमेडी शोमध्ये झळकणार आहेत.सध्या कपिल शर्माच्या आजारपणामुळे त्याचा शो 'द कपिल शर्मा' शो बंद झाला आणि त्यानंतर आणखी काही कॉमेडी शो आले त्यात भारती सिंह आणि अनु मलिका यांचा ड्रामा कंपनी शो आला मात्र हा शो रसिकांना हसवण्यात अपयशी ठरला.कपिल शर्मा शो बंद झाल्यामुळे कॉमेडीयन आता वेगवेगळ्या शोमध्ये झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता जॉनी लिव्हर यांनी आणखी एक कॉमेडीयनला मदतीचा हात दिला आहे. आता तो कॉमेडीयन कोण? तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे.कपिलचा मित्र किकू शारदा.होय,किकू शरदा आणि विशाल कोटियन जॉनी लिव्हर यांचा पार्टनर बनत शोमध्ये पाहायला मिळणार आहे. हा शो पोलिस बेस्ड असल्यामुळे जॉनी लिव्हर या शोमध्ये पोलिस कमिश्नरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदाच जॉनी लिव्हर छोट्या पडद्यावर अशा प्रकारचा कॉमेडी फिक्शन शो करताना पाहायला मिळणार आहेत.या शोचे काही भागाचे शूटही झाले असून लवकरच हा शो टीव्हीवर झळकणार असल्याचे कळतंय.कॉमेडी आणि त्यातही स्टँड-अप कॉमेडीला खरी प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता जॉनी लिव्हर यांनी.त्यांच्यामुळेच स्टॅंडअप कॉमेडी सारख्यांना नव्या संधी मिळायला लागली. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं असे किकू शारदाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याचा टीममेट सुनील ग्रोव्हर यांच्यातील वाद आणि मारहाणीच्या बातमीने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.कपिल शर्माची ‘साथ’ सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर वेगवेगळ्या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना झळकतो.अली असगरही 'ड्रामा कंपनी' या शोमध्ये झळकतोय.
![]()
चित्रसृष्टीत नाव कमावण्याचं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतात.रुपेरी पडद्यावर रसिकांची मनं जिंकण्यात सगळ्याच सिने कलाकारांना जमत नाही. या कलाकारांमध्ये मोजकेच कलाकार प्रसिद्धीच्या यशशिखरावर पोहचतात.त्यात सिनेमात जॉनी लिव्हर यांचा कॉमेडी अंदाज रसिकांना भावला त्यामुळे मोठा पडदा गाजवल्यानंतर आता जॉनी लिव्हर छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.