जिया शंकरच्या आईची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 14:30 IST2024-04-09T14:29:40+5:302024-04-09T14:30:47+5:30

जिया शंकरने बिग बॉसमध्ये तिच्या कुटुंबाविषयी खुलासा केला होता.

Jiya Shankar s mother admitted in hospital she is critical actress asked fans to pray for her | जिया शंकरच्या आईची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; पोस्ट करत म्हणाली...

जिया शंकरच्या आईची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; पोस्ट करत म्हणाली...

अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) 'वेड' मराठी सिनेमात झळकली. यानंतर ती 'बिग बॉस' मधून घराघरात पोहोचली. जिया शंकरच्या आईसंदर्भात एक बातमी समोर येत आहे. तिच्या आईची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिने सर्वांना प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिया शंकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, 'नमस्कार, तुम्ही सगळे ठीक असाल अशी आशा आहे. माझी आई सुरेखा गवळी आजारी आहे आणि तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. ती खूप वाईट परिस्थितीतून जात आहे. तुमच्या प्रार्थनांमुळे चमत्कार होईल अशी मला आशा आहे. कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा. सध्या मला त्याची खूप गरज आहे. खूप खूप धन्यवाद. देव तुमच्यावर कृपा करो. स्वस्थ रहा."

जियाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. एकाने लिहिले, 'माझ्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. आंटी लवकर बऱ्या होतील.' तर दुसऱ्याने लिहिले, 'माझ्याकडून तुमच्या आईसाठी प्रार्थना, हिंमत हरु नका.'

जिया शंकरने बिग बॉसमध्ये तिच्या कुटुंबाविषयी खुलासा केला होता. तिच्या वडिलांनी तिला, आईला आणि तिच्या भावाला सोडून दिलं होतं. म्हणूनच जिया आणि तिचा भाऊ वडिलांचं नाव लावत नाहीत. शंकर हे तिच्या वडिलांचं नाव नसून आडनाव आहे. ती १३ वर्षांची असतानाच आईवडिलांचा घटस्फोट झाला.

Web Title: Jiya Shankar s mother admitted in hospital she is critical actress asked fans to pray for her