जितेन लालवानीने हम पाच फिर से या मालिकेच्या सूरज थापरला दिले सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 14:40 IST2017-10-23T09:10:42+5:302017-10-23T14:40:42+5:30

इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षं काम केल्यानंतर अनेक सेलिब्रेटी हे एकमेकांच्या घरातील सदस्यांप्रमाणे होतात. काही तर एकमेकांचे इतके चांगले फ्रेंड्स होतात ...

Jiten Lallawani gave us 5 serials to Suraj Thaipar again | जितेन लालवानीने हम पाच फिर से या मालिकेच्या सूरज थापरला दिले सरप्राईज

जितेन लालवानीने हम पाच फिर से या मालिकेच्या सूरज थापरला दिले सरप्राईज

डस्ट्रीमध्ये अनेक वर्षं काम केल्यानंतर अनेक सेलिब्रेटी हे एकमेकांच्या घरातील सदस्यांप्रमाणे होतात. काही तर एकमेकांचे इतके चांगले फ्रेंड्स होतात की, त्यांच्यामध्ये कधीच स्पर्धेची भावना राहात नाही. जितेन लालवानी आणि सूरज थापर यांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. त्यामुळे त्यांची रिअल लाइफमधील केमिस्ट्री देखील खूपच छान जमून आली आहे. 
ससुराल गेंदा फूल या मालिकेतील त्यांच्या दोघांच्याही भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स आहेत. हम सात आठ है या मालिकेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सूरज आणि जितेन सध्या आपापल्या कामात व्यग्र असल्याने त्यांना एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही. त्यामुळे जितेन थेट सूरजच्या मालिकेच्या सेटवर पोहोचला होता. सुरज सध्या हम पाच फिर से या मालिकेत काम करत आहे. एकता कपूरची हम पाच ही मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेचे नवे व्हर्जन हम पाच फिर से ही मालिका आहे. या मालिकेत देखील पाच मुली आणि त्यांच्या आई वडिलांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आनंद माथुर हे पाचही मुलींचे वडील असल्याचे आपल्याला हम पाच या मालिकेत पाहायला मिळाले होते. हम पाच फिर से या मालिकेत सूरज थापर आनंद माथुरची भूमिका साकारत आहे. 
सूरजच्या हम पाच फिर से या मालिकेच्या सेटवर जितेनने नुकतीच हजेरी लावली. याविषयी सूरज सांगतो, जितेन हा मला भावासारखा आहे. माझ्या प्रत्येक सुख दुःखात तो माझ्या पाठिशी उभा असतो. हम सात आठ है ही मालिका सोळा वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत आम्ही राम आणि लक्ष्मण अशा भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेपासूनच आमच्यात खूप चांगले नाते आहे. जितेनला हम पाच फिर से या मालिकेच्या सेटवर पाहून मला खूप आनंद झाला होता. 

Web Title: Jiten Lallawani gave us 5 serials to Suraj Thaipar again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.