​गहना वशिष्ठ करणार बिग बॉसमध्ये एंट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 13:11 IST2017-12-04T07:41:44+5:302017-12-04T13:11:44+5:30

बिग बॉसचे आजवरचे सगळे सिझन चांगलेच गाजले आहेत. पण यंदाच्या सिझनला अजूनही तितकासा टिआरपी मिळालेला नाही. या सिझनमध्ये पहिल्या ...

Jewel Vashist to enter Bigg Boss? | ​गहना वशिष्ठ करणार बिग बॉसमध्ये एंट्री?

​गहना वशिष्ठ करणार बिग बॉसमध्ये एंट्री?

ग बॉसचे आजवरचे सगळे सिझन चांगलेच गाजले आहेत. पण यंदाच्या सिझनला अजूनही तितकासा टिआरपी मिळालेला नाही. या सिझनमध्ये पहिल्या भागापासून प्रेक्षकांना कॉन्ट्रोव्हर्सी पाहायला मिळत आहे. बिग बॉस म्हटले की कॉन्ट्रोव्हर्सी ही आलीच, त्यामुळे कॉन्ट्रोव्हर्सीमुळे हा सिझन गाजेल असे कार्यक्रमाच्या टीमला वाटले होते. पण या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे तितकेसे प्रेम मिळवता आले नाही. पण आता या कार्यक्रमात एक नवीन एंट्री होणार असून या एंट्रीनंतर कार्यक्रमाच्या टीआरपीत नक्कीच फरक पडेल असे सगळ्यांना वाटत आहे.
बिग बॉस या कार्यक्रमात आता गहना वशिष्ठची एंट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. गहना ही एक अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच गहना हे नाव चांगलेच चर्चेत राहिले आहे. कारण तिने बिग बॉसच्या अनेक स्पर्धकांबाबत आजवर मीडियामध्ये वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. अर्शी खानचे वय २७ असल्याचे ती सगळ्यांना सांगते पण तिचे वय ३२ असून मी तिला शाळेच्या दिवसांपासून ओळखते असे गहनाने मीडियाला सांगितले होते. तसेच तिने तिच्या शिक्षणाबाबत देखील खोटे सांगितले असल्याचे गहनाने म्हटले होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आणि अर्शीचे संबंध असल्याचे अर्शीने अनेकवेळा म्हटले आहे. पण अर्शी शाहिदला कधी भेटलीच नाही असा दावा गहनाने केला आहे.
केवळ अर्शीच नव्हे तर विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यांच्याबाबत तिने मीडियाला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. शिल्पा आणि विकास यांच्यात शारीरिक संबंध होते. तसेच ते बिग बॉसच्या घरात लग्न देखील करू शकतात असे गहनाने सांगितले होते. 
गहनाला बिग बॉसमधील अनेक स्पर्धकांची गुपिते माहीत असल्याने ती बिग बॉसच्या घरात गेल्यास घरात चांगलाच भूकंप होणार असल्याचे म्हटले जात आहे. गहना काही दिवसांपासून कोणाचाच फोन उचलत नसल्याने तसेच ती सोशल मीडियापासून दूर असल्याने ती बिग बॉसच्या घरात लवकरच जाणार असल्याची चर्चा आहे.

Also Read : ​प्रियांक शर्माने हिना खानला केला अश्लील इशारा; नंतर म्हटले चूक झाली!

Web Title: Jewel Vashist to enter Bigg Boss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.