​बेहद या मालिकेसाठी जेनिफर विंगेटने केले टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 13:00 IST2017-07-13T07:29:10+5:302017-07-13T13:00:04+5:30

बेहद या मालिकेत जेनिफर विंगेट माया ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. ...

Jennifer Wingtte made bald bales for this series | ​बेहद या मालिकेसाठी जेनिफर विंगेटने केले टक्कल

​बेहद या मालिकेसाठी जेनिफर विंगेटने केले टक्कल

हद या मालिकेत जेनिफर विंगेट माया ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. मायामध्ये असलेला वेडेपणा तिने तिच्या भूमिकेतून खूपच चांगल्याप्रकारे सादर केला आहे. या मालिकेद्वारे जेनिफरने छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे. या मालिकेमुळे तिच्या करियरला एक चांगले वळण मिळाले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. जेनिफर आता या मालिकेत प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मायाने टक्कल केलेले दिसणार आहे. जेनिफरच्या या नव्या लूकचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. 
जेनिफरने पूर्णपणे टक्कल केलेले या फोटोत दिसत असून हे पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. जेनिफरने या मालिकेसाठी केस कापले आहेत का हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण तिने टक्कल केले नसून ही मेकअपची करामत आहे. ती या मालिकेसाठी सध्या विग लावत आहे. जेनिफरने या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, बोल्ड टू बाल्ड... मी टक्कल केले आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. या माझ्या लूकसाठी माझे मेकअपमन धनंजय दादा सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी मायाचा बाल्ड पण ब्युटिफूल अवतार लोकांच्यासमोर आणला आहे. माझ्या या नव्या रूपाला पाहाण्यासाठी बेहद ही मालिका नक्कीच पाहात राहा...
या पोस्टसोबतच तिने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांना जेनिफर माया कशी बनते हे आपल्याला  पाहायला मिळत आहे. 

Also Read : बेहद फेम जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
 

Web Title: Jennifer Wingtte made bald bales for this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.