बेहद या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान जेनिफर विंगेटला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:58 IST2016-12-28T17:58:43+5:302016-12-28T17:58:43+5:30
जेनिफर विंगेटची दिल मिल गये ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. जेनिफर विंगेटच्या सरस्वतीचंद्र ...
बेहद या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान जेनिफर विंगेटला झाली दुखापत
ज निफर विंगेटची दिल मिल गये ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. जेनिफर विंगेटच्या सरस्वतीचंद्र या मालिकेला तर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेसाठी जेनिफरला अनेक पुरस्कारदेखील मिळालेले आहेत.
दिल मिल गये या मालिकेच्या सेटवर जेनिफर आणि करणसिंग ग्रोव्हरची भेट झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. पण करणने जेनिफरला घटस्फोट देऊन अभिनेत्री बुपाशा बासूसोबत लग्न केले. जेनिफरच्या आयुष्यात आलेल्या या वादळामुळे ती दरम्यानच्या काळात छोट्या पडद्यापासून दूर होती. पण सध्या ती बेहद या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेत पहिल्यांदाच ती ग्रे शेड असलेली भूमिका साकरत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती नुकतीच मॉरिशसला गेली होती. त्यावेळी चित्रीकरणादरम्यान तिच्या नाकाला दुखापत झाली.
![Jennifer Winget injured while shooting for Beyhadh]()
एका दृश्यासाठी जेनिफर आणि कुशल टंडनला डायविंग हेल्मेट घालून पाण्याखाली जायचे होते. पण या हेल्मेटचे वजन तब्बल 45 किलो होते. जेनिफरला या हेल्मेटचे वजन सांभाळणे खूपच कठीण जात होते. हे हेल्मेट सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या नाकाला दुखापत झाली. पण या मालिकेच्या टीमने तिच्यावर तातडीने औषधोपचार केले. जेनिफरनेदेखील वर्क कम्स फर्स्ट असे म्हणत लगेचच पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. याविषयी जेनिफर सांगते, "हेल्मेटचे वजन फारच जास्त असल्याने ते सांभाळताना माझ्या नाकी नऊ आले होते. हे हेल्मेट मला सांभाळता येत नसल्याने माझे प्रशिक्षक मला मदत करत होते. पण ते हेल्मेट त्यांच्याच हातून सुटले आणि माझ्या नाकावर आदऴले. यामुळे माझ्या नाकाला जखम झाली. पण लगेचच माझ्या टीममधील मंडळींनी त्यावर औषध लावले. थोडासा आराम केल्यानंतर मी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. कारण चित्रीकरणासाठी आमच्याकडे खूपच कमी वेळ होता."