'जीव माझा गुंतला' मालिकेमधील अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 15:35 IST2021-08-23T15:35:06+5:302021-08-23T15:35:31+5:30
जीव माझा गुंतला या मालिकेत मेघची भूमिका साकारणारा अभिनेता रौनक शिंदेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

'जीव माझा गुंतला' मालिकेमधील अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा
कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. रिक्षा चालवून स्वतःचे शिक्षण घेणारी अंतरा प्रेक्षकांना खूप भावली आहे. या मालिकेतील मेघची भूमिका साकारणारा अभिनेता रौनक शिंदेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. रौनक शिंदे हा मराठी मालिका अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.
रौनक शिंदेने नुकतेच त्याची मैत्रीण प्राची मोरेसोबत साखरपुडा केला आहे. हे दोघे एकमेकांना मागील ७ वर्षांपासून ओळखत आहेत आणि आता हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत.
प्राची मोरे ही बिजनेस वुमन आहे. प्राची मोरे ही प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. पाईनअॅप्पल या स्टुडिओ अंतर्गत ती आपला व्यवसाय चालवत आहे. तसेच mommolates या चॉकलेट संबंधित आणि bombaymill या कपड्यांच्या ब्रँडशी ती जोडली गेली आहे.
अभिनेता रौनक शिंदेने जीव माझा गुंतला या मालिकेसोबतच स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत काम केले आहे. अली आदिलशहा ही भूमिका त्याने साकारली होती.
दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर काय घडतं? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असंच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार-अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे.