"महेश सरांचा आवाज आणि दरारा...", 'बिग बॉस मराठी'चा होस्ट बदलल्यानंतर जय दुधाणे स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:49 IST2024-05-27T13:48:42+5:302024-05-27T13:49:08+5:30

"हिंदीमध्ये सलमानऐवजी करण जोहरला होस्ट केलं तेव्हा...", 'बिग बॉस मराठी'चा होस्ट बदलल्यानंतर जय दुधाणेचं मोठं वक्तव्य

jay dudhane expressed his views on ritesh desmukh replace mahesh manjarekar in bigg boss marathi | "महेश सरांचा आवाज आणि दरारा...", 'बिग बॉस मराठी'चा होस्ट बदलल्यानंतर जय दुधाणे स्पष्टच बोलला

"महेश सरांचा आवाज आणि दरारा...", 'बिग बॉस मराठी'चा होस्ट बदलल्यानंतर जय दुधाणे स्पष्टच बोलला

'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला रिएलिटी शो आहे. नुकतंच 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच बिग बॉस मराठी ५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये महेश मांजरेकर सूत्रसंचालन करताना दिसणार नाहीत. तर मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी' ५ होस्ट करणार आहे. याबाबत आता 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेने भाष्य केलं आहे. 

जय दुधाणे 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या सीझनच्या टॉप २ स्पर्धकांमध्ये त्याने जागा मिळवली होती. पण, या पर्वाची ट्रॉफी त्याला नावावर करता आली नाही. असं असलं तरी  'बिग बॉस'मुळे जय प्रसिद्धीझोतात आला होता. 'बिग बॉस'ने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. महेश मांजरेकरांच्या कायमच रडारवर असलेल्या जय दुधाणेने 'बिग बॉस'चा बदलेल्या होस्टबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचं मत मांडलं आहे. 

"रितेश देशमुख सिनियर आहेत. त्यांनी हिंदीतही काम केलं आहे. पण, खरं सांगू का महेश सर जेव्हा चावडीवर यायचे तेव्हा कोणामध्येही साधं हलायचीदेखील हिंमत नसायची. एवढा सरांचा दरारा होता. मला तर नेहमी ओरडा पडायचा. सरांचा एक वेगळाच ऑरा आहे. हिंदीमध्येही असा प्रयोग केला गेला होता. ओटीटीसाठी करण जोहरला होस्ट केलं होतं. पण, ते बॅकफायर झालं. कारण, सलमान खान सलमान खान आहे. त्यामुळे मला तरी महेश सरच तिथे बघायला आवडले असते. कारण, सर म्हणजे रिअल बिग बॉस", असं जय दुधाणे रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

'बिग बॉस'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता जय दुधाणे स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत जय पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: jay dudhane expressed his views on ritesh desmukh replace mahesh manjarekar in bigg boss marathi