जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 17:10 IST2024-05-09T17:08:21+5:302024-05-09T17:10:19+5:30

माधुरी दीक्षितपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांनी 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा 'गुलाबी साडी' गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

jay bhanushali daughter taara dance on gulabi sadi netizens praise her watch video | जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक

जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात. गेल्या कित्येक दिवसांपासून 'गुलाबी साडी' हे गाणं ट्रेंड होत आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर रील व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांनी 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा 'गुलाबी साडी' गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

अभिनेता जय भानुशालीच्या लेकीलाही 'गुलाबी साडी'ची भुरळ पडली आहे. जय भानुशालीची चिमुकली तारा हिने 'गुलाबी साडी'वर डान्स केला आहे. तिचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ताराच्या या 'गुलाबी साडी' डान्स व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओतील तिचे हावभाव पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 'गुलाबी साडी'वरील ताराचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. 

या व्हिडिओत तारा 'गुलाबी साडी'तील गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "तुमची मुलगी किती क्यूट आहे. तिची स्टाइल तिला वेगळं बनवते", "किती छान डान्स करतेय", "तिचे हावभाव किती छान आहेत", अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ताराच्या या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

Web Title: jay bhanushali daughter taara dance on gulabi sadi netizens praise her watch video