'३ इडियट्स' फेम अ‍ॅक्ट्रेस या दिवशी अडकणार लग्नबेडीत, न्यूड व्हि़डिओमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 04:33 PM2019-12-25T16:33:42+5:302019-12-25T16:34:08+5:30

Mona Singh's Wedding : मोना सिंग या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले असून तिची एक मालिका तर प्रचंड गाजली होती.

Jassi Jaisi Koi Nahin actress Mona Singh all set to marry banker boyfriend on December 27 | '३ इडियट्स' फेम अ‍ॅक्ट्रेस या दिवशी अडकणार लग्नबेडीत, न्यूड व्हि़डिओमुळे आली होती चर्चेत

'३ इडियट्स' फेम अ‍ॅक्ट्रेस या दिवशी अडकणार लग्नबेडीत, न्यूड व्हि़डिओमुळे आली होती चर्चेत

googlenewsNext

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये मोना सिंगचा समावेश आहे. मोनाला जस्सी जैसी कोई नहीं या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने बऱ्याच मालिकेत काम केलं आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मोना सिंग लवकरच लग्न करणार आहे. पण, हे वृत्त चुकीचं असल्याचं मोनानं सांगितलं होतं.


टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मोनाचे लग्न निश्चित झालं आहे आणि ती २७ डिसेंबरला एका बँकरसोबत लग्न करणार आहे. हो मोना दोन दिवसात लग्नबेडीत अडकणार आहे.


मोनाचे लग्न मुंबईत होणार आहे. लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबातील काही व्यक्ती आणि खास मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत.


टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रानं सांगितलं की, मोनाला तिच्या खास दिवशी मीडियाचं अटेंशन नको आहे. तिच्या जवळच्याच व्यक्तींना लग्नासाठी बोलवलं जाणार आहे. लग्नाची सर्व विधी उद्या (२६ डिसेंबर) होणार आहेत.

मोनाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगितलं जातंय की तो साऊथ इंडियन बँकर आहे आणि त्याचं नाव श्याम आहे. लग्नात गौरव गेरा, राजेश खेरा व रक्क्षंदा खान हजेरी लावू शकतात, असं बोललं जात आहे. मोनाने नुकतेच गोव्यात स्पिनस्टर्स पार्टी सेलिब्रेट केली होती.


मोना सिंगच्य वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिला जस्सी जैसी कोई नहींमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत ओळख मिळाली होती. त्याशिवाय क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो व कवच खाली शक्तियों से या मालिकेत तिने काम केलं होतं.

मोना सिंग आमीर खान व करीना कपूरच्या लाल सिंग चड्ढामध्ये झळकली होती.

Web Title: Jassi Jaisi Koi Nahin actress Mona Singh all set to marry banker boyfriend on December 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.