जस्मिनला रडू कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 17:50 IST2016-09-19T12:19:19+5:302016-09-19T17:50:02+5:30
टशन-ए-इश्क या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत जस्मिन भसीन प्रमुख भूमिका साकारत होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या ...

जस्मिनला रडू कोसळले
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">टशन-ए-इश्क या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत जस्मिन भसीन प्रमुख भूमिका साकारत होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी जस्मिन खूपच उदास झाली होती. ही मालिका गेले वर्षंभर सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत होता. या मालिकेत जस्मिनसोबत सिद्धांत गुप्ता आणि नमन शॉ यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी या सर्व कलाकारांचे छोटे गेटटुगेदर करण्यात आले होते. सिद्धांतचे चित्रीकरण नसले तरी तोही सेटवर उपस्थित होता. या गेटटुगेदरच्यावेळी जस्मिनला तिचे अश्रू आवरले नाहीत. सगळ्यांनी केक कापून आपल्या आवडत्या सहकलाकारांना निरोप दिला. या मालिकेविषयी जास्मिन सांगते, "ट्विंकल या व्यक्तिरेखेमुळे मला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेला, माझ्या सहकलाकारांना मी खूप मिस करणार आहे."