जस्मिन भसिनने ह्या भूमिकेसाठी बेबोकडून घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 19:37 IST2019-01-07T19:37:01+5:302019-01-07T19:37:57+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जस्मिन भसिन स्टार प्लस वाहिनीवरील 'दिल तो हॅपी है जी' मालिकेतून प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Jasmine Bhasin took inspiration for this role | जस्मिन भसिनने ह्या भूमिकेसाठी बेबोकडून घेतली प्रेरणा

जस्मिन भसिनने ह्या भूमिकेसाठी बेबोकडून घेतली प्रेरणा

ठळक मुद्दे'दिल तो हॅपी है जी' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाजस्मिन भसिन दिसणार पंजाबी मुलीच्या भूमिकेत


अभिनेत्री जस्मिन भसिन ही तिच्या 'टशन-ए-इश्क' आणि 'दिल से दिल तक' मधील भूमिकांसाठी आजही नावजली जाते. स्टार प्लस वाहिनीवर 'दिल तो हॅपी है जी' ही नवीन मालिका लवकरच दाखल होत आहे. या मालिकेत ती हॅपी या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
'दिल तो हॅपी है जी' मधील तिच्या भूमिकेसाठी ती तयारी करत असून यात ती एका तरूण, बडबड्‌या मुलीची भूमिका साकारते आहे. जिचे ध्येय केवळ आपल्या आजूबाजूला आनंद पसरवणे हे आहे. अशा प्रकारची एकच व्यक्तिरेखा आपल्या मनात येते जब व्ही मेट मधील गीत ऊर्फ करीना कपूर खानची. जस्मिननेसुद्धा ह्या भूमिकेच्या तयारीसाठी गीतच्या भूमिकेकडून प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे आपल्याला जणू करीनाच छोट्‌या पडद्यावर दिसणार आहे.
जस्मिन 'दिल तो हॅपी है जी' मालिकेत पंजाबमधील एक तरूण मुलगी हॅपीची भूमिका करणार असून ती जिथे कुठे जाईल तिथे केवळ आनंद पसरवणे हाच तिचा हेतू आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल ती म्हणाली, 'हॅपीची व्यक्तिरेखा खूप साधी पण तरीही रोचक आहे. ह्या भूमिकेची तयारी करण्यासाठी मी प्राणायाम आणि योगाभ्यास करायला सुरूवात केली आहे. मला वाटते हे करून मला आतून छान वाटेल आणि मी माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेन. मी रोज सकाळी एक तास सराव करते. मला माझ्यात फरक जाणवायला लागला असून त्याबद्दल खूप मस्तही वाटते आहे.'


'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये जास्मीन बबली गर्लच्या रोलमध्ये दिसत आहेत. यापूर्वी जस्मिन कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका दिल से दिल तकमध्ये टेनीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. आता ती हॅपीच्या भूमिकेतून रसिकांना भुरळ पाडते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 'दिल तो हॅपी है जी' १५ जानेवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्लसवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Jasmine Bhasin took inspiration for this role