जस्मिन भसिनने ऑनस्क्रीन ही दृश्य करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 06:30 IST2019-01-14T06:30:00+5:302019-01-14T06:30:00+5:30

अभिनेत्री जस्मिन भसिनने 'टश्न-ए-इश्क', 'दिल से दिल तक' या मालिकेतील भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील मालिका 'दिल तो हॅपी है जी'मध्ये वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

Jasmine Bhasin refused to give an onscreen view | जस्मिन भसिनने ऑनस्क्रीन ही दृश्य करण्यास दिला नकार

जस्मिन भसिनने ऑनस्क्रीन ही दृश्य करण्यास दिला नकार

ठळक मुद्देजस्मिन भसिन 'दिल तो हॅपी है जी' मालिकेत साकारणार हॅप्पीची भूमिका

अभिनेत्री जस्मिन भसिनने 'टश्न-ए-इश्क', 'दिल से दिल तक' या मालिकेतील भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील मालिका 'दिल तो हॅपी है जी'मध्ये वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. 

जस्मिन भसिन 'दिल तो हॅपी है जी' मालिकेत हॅप्पीची भूमिका साकारीत असून या भूमिकेची सध्या ती तयारी करत आहे. यात ती एका तरूण, बडबड्‌या आनंदी हॅपी मेहराची भूमिका करत आहे. एक अभिनेत्री म्हणून आव्हान मिळेल अशाच भूमिका जस्मिनने साकारल्या आहेत. ती म्हणते की, 'तिने ही भूमिका घेतली कारण ती अतिशय वास्तववादी आणि अगदी तिच्यासारखीच आहे. ह्या शोमध्ये हॅपी-गो- की भूमिका साकारताना मात्र बोल्ड सीन्स तिला करायचे नाहीl. “मी ऑनस्क्रीन बोल्ड दृश्ये केली तर निश्चितपणे माझ्या आईबाबांना ते आवडणार नाही आणि जर काही गोष्टींबाबत माझ्या मनात शंका असेल तर त्या मी करणारच नाही. त्यामुळे अशा दृश्यांसाठी मला विचारण्यात आले तर मी ते करणार नाही.'


जस्मिन 'दिल तो हॅपी है जी' मालिकेत पंजाबमधील एक तरूण मुलगी हॅपीची भूमिका करणार असून ती जिथे कुठे जाईल तिथे केवळ आनंद पसरवणे हाच तिचा हेतू आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल ती म्हणाली, 'हॅपीची व्यक्तिरेखा खूप साधी पण तरीही रोचक आहे. ह्या भूमिकेची तयारी करण्यासाठी मी प्राणायाम आणि योगाभ्यास करायला सुरूवात केली आहे. मला वाटते हे करून मला आतून छान वाटेल आणि मी माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेन. मी रोज सकाळी एक तास सराव करते. मला माझ्यात फरक जाणवायला लागला असून त्याबद्दल खूप मस्तही वाटते आहे.'
जस्मिन भसिनला हॅपीच्या रूपात ‘दिल तो हॅपी है जी’ मध्ये १५ जानेवारीपासून संध्याकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Jasmine Bhasin refused to give an onscreen view