n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">दिल से...दिल तक ही सरोगसीवर आधारित मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सलमान खानच्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटावर बेतलेली असणार आहे. एक गुजराती मुलाची आणि बंगाली मुलीची प्रेमकथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे हे दोघे लग्न करतात. पण लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही त्यांना मूल होत नाही. त्यामुळे ते सरोगसीची मदत घेतात. या मालिकेत अभिनेत्री जास्मिन बसीन सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटात ही भूमिका प्रीती झिंटाने साकारली होती. जास्मिन या भूमिकेला कितपत न्याय देते हे मालिका सुरू झाल्यावरच कळेल.
Web Title: Jasmine Basin plays the role of Preity
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.