जास्मीन भसीनचा ट्रेडिशनल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 18:30 IST2018-09-25T14:33:48+5:302018-09-26T18:30:00+5:30

कलर्स वाहिनीवरील दिल से दिल तक या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जास्मीन भसीन काही दिवसांपूर्वी तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे चर्चेत आली होती.

Jasmin Bhasin's Traditional Look | जास्मीन भसीनचा ट्रेडिशनल लूक

जास्मीन भसीनचा ट्रेडिशनल लूक

ठळक मुद्देजास्मीनने नेसली मरून रंगाची साडीजास्मीन ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत होती अप्रतिम

कलर्स वाहिनीवरील दिल से दिल तक या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जास्मीन भसीन काही दिवसांपूर्वी तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे चर्चेत आली होती. तिचे हे फोटोशूट बऱ्याच लोकांना आवडले. तिला वेस्टर्न आऊटफीट चांगले दिसतात. मात्र नुकतेच तिने एका पार्टीसाठी साडी नेसली होती. 


अभिनेत्री जास्मीन भसीन साडीत अप्रतिम दिसत होती. तिने मरून रंगाची साडी नेसली होती आणि केस मोकळे सोडले होते. कमी मेकअप व डार्क लिपस्टिक लावली होती. मात्र ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. पार्टीमध्ये तिच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


याबाबत ती सांगते की, मी साडी नेसत नाही. पण, जेव्हा केव्हा नेसते तेव्हा मी खूप एन्जॉय करते. पार्टीसाठी मी साडी नेसायचा योग्य निर्णय घेतला. साडी नेसून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यामुळे मी खूप खूश आहे. माझा साडीतला लूक मला खूप आवडला. त्यामुळे आतापासून मी जास्त साड्या नेसणार आहे.
 

Web Title: Jasmin Bhasin's Traditional Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :colourरंग