‘जमाई राजा’ मालिकेत २ वर्षांचा लीप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 15:35 IST2016-04-27T10:05:49+5:302016-04-27T15:35:49+5:30

प्राईम टाईम मालिका ‘जमाई राजा’ च्या टीमने प्रेक्षकांना मालिकेची कन्सेप्ट आणि कथानक यांच्यामुळे खिळवून ठेवले आहे. सिद आणि रोशनी ...

'Jamai Raja' series leap for 2 years! | ‘जमाई राजा’ मालिकेत २ वर्षांचा लीप!

‘जमाई राजा’ मालिकेत २ वर्षांचा लीप!

राईम टाईम मालिका ‘जमाई राजा’ च्या टीमने प्रेक्षकांना मालिकेची कन्सेप्ट आणि कथानक यांच्यामुळे खिळवून ठेवले आहे. सिद आणि रोशनी हे दोघे आता दुरावले जाणार असून हाच टिष्ट्वस्ट मालिकेत आणण्यात आला आहे.

अचानकपणे झालेल्या डीडी च्या मृत्यूसाठी रोशनी सिदला जबाबदार ठरवते. आता शो दोन वर्षांचा लीप घेणार आहे. ‘जमाई राजा’ च्या टीमची प्रचंड मेहनत आणि अभिनय यांच्यामुळे मालिका चाहत्यांमध्ये खुप प्रसिद्ध होत आहे. डीडीच्या मृत्यूच्या शॉकमधून बाहेर येत नाहीत तर त्यांना लगेचच सिद-रोशनी यांच्या दुराव्याला सामोरे जावे लागणार आहे.

अजून काही नवे कॅरेक्टर्स यात घेण्यात येणार आहेत. डीडी ही आत्तापर्यंतची छोट्या पडद्यावरील सर्वांत स्टायलिश सासू दाखवण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना ती म्हणते,‘ दुर्गा देवीसारखी भूमिका मी आत्तापर्यंत प्ले केले नाही.

पण, मला कलाकार म्हणून ते खुणावत होते. मी अशाप्रकारची भूमिका कधीही केलेली नव्हती. डीडीची भूमिका माझ्यासाठी सतत माझ्या हृदयाजवळीची राहील.’
jamai raja

jamai raja

Web Title: 'Jamai Raja' series leap for 2 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.