'लगीरं झालं जी' मालिकेत उडणार जयडी आणि हर्षवर्धनच्या लग्नाचा बार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 14:18 IST2018-09-26T12:56:53+5:302018-09-26T14:18:00+5:30
झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे.

'लगीरं झालं जी' मालिकेत उडणार जयडी आणि हर्षवर्धनच्या लग्नाचा बार
झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. वर्षापूर्वी चालू झालेल्या या मालिकेतील अज्या आणि शीतली सोबत प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे.
नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की शीतल आणि अजिंक्यने आसाममध्ये गणेशोत्सव साजरा केला आणि तेथील लोकांना आपल्या संकृती व परंपरांचं दर्शन करवलं. मालिकेत हर्षवर्धन शीतलला धमकी देतो जर ती आसामला गेली तर परत आल्यावर तिचं घर तिचं राहणार नाही. त्यामुळे हर्षवर्धन शीतल इकडे नसताना जयडीशी लग्न करायची चाल खेळतो. मामी देखील हर्षवर्धनकडे असलेलं ऐश्वर्य बघून जयडीला त्याच्याशी लग्न करायची गळ घालत आहेत. शीतलला याची काहीच कल्पना नाही आहे. जयडीचं लग्न हर्षवर्धनशी होईल का? हर्षवर्धनची यामागे काय उद्देश आहे? शीतलला या सगळ्याची कल्पना आल्यावर ती काय पाऊल उचलणार? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
आसाममध्ये गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या कार्यक्रमात शीतल आणि अजिंक्य डान्स केला. अजिंक्यने एखादी गोष्ट म्हटली आणि ती शीतलने पूर्ण केली नाही असं होणार थोडं कठिण आहे. अजिंक्यने कर्नल साहेबांसमोर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शीतल स्वतः कर्नल साहेबांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि कर्नल साहेब कार्यक्रमाला हजेरी देखील लावली. त्यांच्या समोरशीतल आणि अजिंक्य एक छान रोमँटिक गाण्यावर परफॉर्म केले आणि प्रेक्षकांकडून त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी दाद देखील मिळाली.