जान्हवीनं गाठलं थेट कोल्हापूर, धनंजय पोवार आणि त्याच्या कुटुंबाची घेतली भेट, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:57 IST2025-07-08T17:56:42+5:302025-07-08T17:57:08+5:30
जान्हवी किल्लेकर हिने कोल्हापूरात धनंजय पोवारची भेट घेतली.

जान्हवीनं गाठलं थेट कोल्हापूर, धनंजय पोवार आणि त्याच्या कुटुंबाची घेतली भेट, पाहा व्हिडीओ
Jahnavi Killekar Meets Dhananjay Powar: 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रचंड गाजलं होतं. या पर्वातील सर्व स्पर्धक महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले होते. याच स्पर्धकांपैकी दोन महत्त्वाची नावं म्हणजे कोल्हापूरचा धनंजय पोवार आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi killekar). बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये कधी भांडण तर कधी मैत्रीपुर्ण नात पाहायला मिळालं होतं. 'बिग बॉस' संपलं असलं तरी हे दोघं त्यांच्यातील मैत्रीचं नात जपताना दिसत आहे. नुकतंच 'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकरनं धनंजय पोवारची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे.
नुकतंच जान्हवी ही कोल्हापूरला पोहचली. यावेळी तिने धनंजय पोवारच्या 'सोसायटी फर्निचर' या फर्निचर शोरूमला भेट दिली. या भेटीचा व्हिडीओ धनंजयने सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये जान्हवी ही धनंजयच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेताना पाहायला मिळाली. तर धनंजयच्या पत्नीने जान्हवीला त्यांच्या ब्रँडची खास साडी भेट दिली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. दोघांच्या या भेटीनं चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा 'बिग बॉस'च्या आठवणी जाग्या केल्या.
जान्हवी किल्लेकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात तिच्या विशेष स्वभावामुळे चर्चेत आहे. तिचे घरात अनेक लोकांशी वाद झाले होते. जान्हवी किल्लेकरचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिला एक मुलगाही आहे. जान्हवीच्या नवऱ्याचं नाव आहे किरण किल्लेकर असं आहे. जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. तर धनंजय पोवारबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमात पाहायला मिळाला.