जान्हवीच्या ट्रोलिंगचा लेकावर होतोय परिणाम, अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा, म्हणाले- "त्याला लोक खूप वाईट बोलतात त्यामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 17:42 IST2024-08-31T17:41:18+5:302024-08-31T17:42:21+5:30

जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीच्या स्वभावाबद्दल खास खुलासा केलाय

jahnavi killekar husband kiran killekar talk about how his son effect of bigg boss marathi 5 | जान्हवीच्या ट्रोलिंगचा लेकावर होतोय परिणाम, अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा, म्हणाले- "त्याला लोक खूप वाईट बोलतात त्यामुळे...

जान्हवीच्या ट्रोलिंगचा लेकावर होतोय परिणाम, अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा, म्हणाले- "त्याला लोक खूप वाईट बोलतात त्यामुळे...

सध्या बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकरची चांगलीच चर्चा आहे. जान्हवीने तिच्या खास खेळाने घरात आणि घराबाहेर चांगलीच चर्चा मिळवली आहे. जान्हवी गेल्या आठवड्यात शिक्षेस पात्र ठरली. कारण तिने पॅडी कांबळेचा चांगलाच अपमान केला होता. याशिवाय जान्हवीचे घरात वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, सूरज चव्हाणशीही वाद झाले. या सर्व घटनांवर जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय.

जान्हवीच्या ट्रोलिंगचा लेकावर होतोय परिणाम

किरण किल्लेकर यांनी बिग बॉस मराठीचा त्यांच्या मुलावर कसा परिणाम होतो हे सांगितलंं आहे. ते म्हणतात, "इशान खूप लहान आहे. तो फक्त ८ वर्षांचा आहे. त्याला जान्हवीने सांगून ठेवलेलं की शाळेत आई बिग बॉसमध्ये जातेय हे सांगायचं नाही. तो ज्या शाळेत जातो तिथे सगळ्यांना माहितीये की, इशानची आई बिग बॉसमध्ये आहे. पण कोणी त्याला काही बोलत नाही. फक्त इशानचं इन्स्टाग्रामवर जे अकाऊंट आहे तिथे लोक त्याला घाण बोलत असतात. इशानला जान्हवीने मोबाईल घेऊन दिलाय. तो कुठे मित्रांसोबत खेळायला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जातो. त्यामुळे त्याच्याकडे मोबाईल असावा म्हणून."

किरण किल्लेकर पुढे म्हणतात, "तो कधीकधी इन्स्टावर मला मॅसेज दाखवतो.  एवढं घाण घाण बोलतात त्याला. माझं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला बोला पण त्याला नका बोला. एक किस्सा असा घडला की, जान्हवी-आर्याचं भांडणं झालं होतं. इशानला ताप भरलेला. तो मांडीवर झोपून बिग बॉस बघत होता. त्यावेळी रितेश देशमुख म्हणाला की, इशान आपल्या सर्वांचा आहे. हे ऐकताच तो पटकन उठला. त्याला आम्ही सांगितलं की, आर्या तुझ्या मम्माला बोलली. तेव्हा त्याने विचारलं की, मम्माने तिला मारलं का? आम्ही म्हटलं नाही. कारण ती सॉरी म्हणाली. मग इशानने हुश्श केलं. कारण त्याला माहितीये की, इशानला कोणी काही बोललं त्याची मम्मा कोणाचं ऐकत नाही."

Web Title: jahnavi killekar husband kiran killekar talk about how his son effect of bigg boss marathi 5