'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये जग्गू आजोबा सिम्मीला हात धरुन घरातून बाहेर काढणार, जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:23 IST2022-02-08T18:11:48+5:302022-02-08T18:23:35+5:30

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

Jaggu's grandfather Simmi Aunty will be evicted from the house | 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये जग्गू आजोबा सिम्मीला हात धरुन घरातून बाहेर काढणार, जाणून घ्या यामागचं कारण

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये जग्गू आजोबा सिम्मीला हात धरुन घरातून बाहेर काढणार, जाणून घ्या यामागचं कारण

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सध्या या मालिकेत अनेक रंजक वळण येतं असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या यश आणि नेहा यांच्यात शीत युद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून यश सातत्याने नेहाचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय. अखेर यशने नेहाच्या आयुष्यातून कायमचं जाण्याचा निर्णय घेतला आहे. दर दुसरीकडे सीम्मी यशसाठी एक स्थळ घेऊन येते. जिचा आधी लग्न झालेलं असते आणि ती एका मुलीची आई एसते . यावर जग्गू आजोबा सीम्मीवर प्रचंड चिडतात आणि ते इथंवरच थांबत नाहीत तर सिम्मी आणि स्वत:चा मुलाला घराबाहेर काढतात.  

सध्या सोशल मीडियावर यश आणि नेहा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आजोबा सिम्मी आणि त्यांच्या मुलावर चिडलेले दिसतायेत. बीजवर नाहीय माझा नातू..जिला नवऱ्याने सोडून दिलंय आणि पदरात एक मुलं आहे अशी मुलगी तू यशसाठी बघितलीस.असं म्हणताना दिसतायेत.

त्यामुळे आता नेहाचं सत्य समजल्यावर आजोबा तिला स्वीकार करणार का ?, कारण आजोबांना अजून नेहाचं लग्न झाले असून ती एका मुलीची आई आहे हे सत्य माहिती नाही आहे. त्यामुळे जेव्हा त्यांच्यासमोर हे सत्य येईल त्यावेळी त्यांची काय प्रतिक्रिया असेल.  याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 
 

Web Title: Jaggu's grandfather Simmi Aunty will be evicted from the house