​यह उन दिनो की बात है या मालिकेत झळकणार सुमित मित्तल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 14:49 IST2017-12-21T09:19:23+5:302017-12-21T14:49:23+5:30

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर यह उन दिनों की बात है ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ही मालिका सगळ्याच वयोगटातील ...

It's a matter of those days that Sumit Mittal will be seen in the series | ​यह उन दिनो की बात है या मालिकेत झळकणार सुमित मित्तल

​यह उन दिनो की बात है या मालिकेत झळकणार सुमित मित्तल

नी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर यह उन दिनों की बात है ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ही मालिका सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 90 च्या दशकातील ही कथा असून या मालिकेत प्रेक्षकांना तो काळ पाहायला मिळत आहे. या मालिकेतील समीर म्हणजेच रणदीप राय आणि नैना म्हणजेच आशी सिंह यांची प्रेमकथा दाखवली जात आहे. या मालिकेतील समीर आणि नैना यांची प्रेमकथा ही एका जोडप्याच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हे जोडपे म्हणजे दुसरे कोणीही नसून शशी सुमीत प्रॉडक्शनचे शशी आणि सुमित मित्तल आहेत. या मालिकेत आता सुमित मित्तल प्रेक्षकांना अभिनय करताना दिसणार आहेत. सुमित मित्तल यांची मालिकेत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमित मित्तल यांनी या मालिकेसाठी नुकतेच चित्रीकरण केले असून प्रेक्षकांना त्यांचा एक वेगळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
आजपर्यंत नैनाच्या दृष्टिकोनातून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता निर्मात्यांनी समीरच्या दृष्टिकोनातून कथेमध्ये काही नवीन बदल केले आहेत. याविषयी सुमित मित्तल सांगतात,” तुम्ही जे ऐकलं की, मी माझ्या यह उन दिनों की बात है या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे, ते अगदी बरोबर आहे. मी या मालिकेत वयस्क समीरची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या मालिकेचे आणि संपूर्ण व्हिज्युअलचे चित्रीकरण सिल्हेटमध्ये करण्यात आले आहे आणि मला त्याची झलक दिसत आहे. आमच्या मालिकेचे कथानक 90 च्या दशकामधले असून कोवळ्या वयातील प्रेमकथा आमच्या मालिकेत दाखवण्यात आली आहे. माझ्या आणि शशीच्या वास्तविक जीवनावर ही मालिका आधारित आहे. त्यामुळे या मालिकेत काम करताना मी अभिनय करतोय असे मला कधी वाटलेच नाही. या मालिकेत काम करायचे असे मी काहीही प्लानिंग केले नव्हते. पण योगायोगाने मी सिन्सच्या शूटसाठी सेटवर होतो. या दृश्यासाठी मीच अगदी योग्य आहे असे आमच्या मालिकेच्या टीमला वाटत असल्याने मी या मालिकेत काम करायचे ठरवले.”

Also read : ​पहरेदार पिया की फेम तेजस्वी प्रकाश वायंगणकर सांगतेय, रिश्ता लिखेंगे हम नया

Web Title: It's a matter of those days that Sumit Mittal will be seen in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.