'रात्रीस खेळ चाले'चे असे होते चित्रीकरण, कलाकारांचा अनुभव ऐकून व्हाल दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 19:48 IST2019-02-13T19:48:02+5:302019-02-13T19:48:42+5:30

'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या प्रीक्वेल नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

It would have been like playing the game in the night, you will be listening to the artist's experience | 'रात्रीस खेळ चाले'चे असे होते चित्रीकरण, कलाकारांचा अनुभव ऐकून व्हाल दंग

'रात्रीस खेळ चाले'चे असे होते चित्रीकरण, कलाकारांचा अनुभव ऐकून व्हाल दंग

ठळक मुद्दे'रात्रीस खेळ चाले'चे मेकिंग व्हिडिओ नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल

'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या प्रीक्वेल नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या भागालाही रसिकांनी डोक्यावर घेतले होते. आता प्रीक्वेलमध्ये अण्णाच्या आयुष्यातील घटना दाखवल्या जात आहेत. नाईकांच्या वाड्यातील रहस्यांचे मुळ या भागात दडलेले असल्याची शंका नाकारता येत नाही. आता या मालिकेत शेवंताचा शिरकाव झाला आहे. शेवंता ही सुशल्याची आई आहे. शेवंता आणि आण्णाच्या नातेसंबंधामुळे नाईकांच्या वाड्यातील वातावरणही क्लेषित झाले आहे.



 

या मालिकेचा मेकिंग व्हिडिओ नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या मेकिंगमध्ये मालिकेतील कलाकार रसिकांचे आभार मानताना दिसत आहेत. या मालिकेचा युएसपी त्यांचे कॅमेरावर्क आहे. त्याचे पार्श्वसंगीत हे देखील मालिकेच्या प्रभावात भर घालते. एकुणच काय ही मालिका रसिकांना घाबरवण्यास यशस्वी ठरली आहे.

Web Title: It would have been like playing the game in the night, you will be listening to the artist's experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.