हे काम करणं अभिज्ञासाठी होतं कठीण, जाणून घ्या काय आहेत कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 06:45 AM2018-06-14T06:45:58+5:302018-06-14T13:25:27+5:30

छोट्या पडद्यावरील 'खुलता कळी खुलेना' ही मालिका रसिकांना भावली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली होती. मात्र या ...

It was hard for the ignorance to work, the reasons why are there to know | हे काम करणं अभिज्ञासाठी होतं कठीण, जाणून घ्या काय आहेत कारणे

हे काम करणं अभिज्ञासाठी होतं कठीण, जाणून घ्या काय आहेत कारणे

googlenewsNext
ट्या पडद्यावरील 'खुलता कळी खुलेना' ही मालिका रसिकांना भावली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली होती. मात्र या मालिकेतील मोनिकाला पाहून रसिकांचा तीळपापड व्हायचा. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने ही भूमिका साकारली होती. नकारात्मक मोनिका तिने मोठ्या खूबीने साकारली होती. छोट्या पडद्यावरील ही मोनिका तिने विलक्षण ताकदीने साकारली होती. ती पाहून रसिकांना राग यायचा खरा, मात्र तिच्या अभिज्ञाच्या सशक्त अभिनयाला पोचपावती होती. तिचा नकारात्मक अंदाज रसिकांना भावला होता. यासोबतच अभिज्ञाने सकारात्मक भूमिकाही साकारल्या. मालिकांसह वेबसिरीजमध्येही ती झळकली. सध्या ती 'कट्टीबट्टी' या मालिकेत पाहायला मिळत आहे. अभिज्ञा या मालिकेत परागच्या मैत्रिणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. नकारात्मक भूमिका यशस्वीरित्या साकारत रसिकांच्या मनात घर केलेल्या अभिज्ञाला 'कट्टीबट्टी' या मालिकेतून हटके भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.यांत ती बबली स्वरुपाची अनुष्का ही भूमिका साकारली आहे. पराग आणि पूर्वाच्या प्रेमात आलेली बबली अनुष्का ही भूमिका साकारत अभिज्ञाने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. अनुष्काच्या भूमिकेच्या माध्यमातून अभिज्ञाला हटके तितकीच सकारात्मक भूमिका साकारण्याची संधी तिला लाभली. नकारात्मक भूमिका साकारल्याने अभिनय कौशल्याला वाव मिळाल्याचे अभिज्ञाला वाटते. या नकारात्मक भूमिकांमुळेच तिच्यातील अभिनय गुण विकसित झाले असून त्याबाबत तिने रसिकांसह साऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र याचवेळी नकारात्मक भूमिकांपेक्षा सकारात्मक भूमिका साकारणं आव्हानात्मक असल्याचे अभिज्ञाला वाटते.नकारात्मक भूमिकांमधून बाहेर पडत बबली अनुष्का अभिज्ञाने मोठ्या खूबीने साकारली आहे. त्यामुळेच की काय अभिज्ञाच्या 'खुलता कळी खुलेना' मालिकेतील मोनिका इतकंच प्रेम 'कट्टीबट्टी'च्या अनुष्काला रसिकांकडून मिळत आहे. 


'कट्टी बट्टी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेचे कथानक हे मराठवाड्याशी संबंधित असल्याने या मालिकेचे चित्रीकरण हे सध्या अहमदनगर येथेच सुरू आहे आणि या मालिकेचे कलाकार देखील याच परिसरातील आहेत. अश्विनी आणि अभिज्ञा यांसारखे प्रसिद्ध कलाकार असण्यासोबतच अनेक नवोदित कलाकार या मालिकेचा भाग आहेत.

Web Title: It was hard for the ignorance to work, the reasons why are there to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.