'इश्कबाज' फेम कुणाल जयसिंह गर्लफ्रेंड भारतीसोबत अडकला लग्नबंधनात, SEE PIC
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:57 IST2018-12-20T16:55:33+5:302018-12-20T16:57:39+5:30
पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता.संगीत सेरेमनीत दोघांचा साखरपुडाही झाला. कुणालने गुडघ्यावर बसून भारतीला प्रपोज केले आणि अंगठी घातली. रिंग घालताना भारती इमोशनल झाल्याचे पाहायला मिळाले होते.

'इश्कबाज' फेम कुणाल जयसिंह गर्लफ्रेंड भारतीसोबत अडकला लग्नबंधनात, SEE PIC
टीव्हीइंडस्ट्रीत विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत 'इश्कबाज' या टीव्ही मालिकेत झळकलेला अभिनेता कुणाल जयसिंहचा उल्लेख करावा लागेल. गर्लफ्रेंड भारतीसोबत आज तो लग्नबंधनात अडकला आहे. पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता.संगीत सेरेमनीत दोघांचा साखरपुडाही झाला. कुणालने गुडघ्यावर बसून भारतीला प्रपोज केले आणि अंगठी घातली. रिंग घालताना भारती इमोशनल झाल्याचे पाहायला मिळाले होते.
कुणाल-भारती गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एवढ्या वर्षांत दोघांनी त्यांच्या नात्याविषयी कधीच उघडपणे कबुली दिली नव्हती.कुणालने एका मुलाखतीत सांगितले होते, काही कारणांमुळे मी आमच्या नात्याविषयी उघडपणे बोलू शकलो नाही. आमचे नाते सगळ्यांना कळल्यानंतर मला काम मिळणार नाही, ही भीती नव्हती. पण जगाला समजण्याआधी आमच्या कुटुंबीयांना आमच्याविषयी कळावे, अशीच माझी इच्छा होती असे त्याने सांगितले .