ईशाने फॉलो केला ट्रेंड! श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यात दाखवला मराठमोळा ठसका, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 12:38 IST2024-06-10T12:37:51+5:302024-06-10T12:38:24+5:30

ईशाचा ट्रेंड विथ ट्विस्ट! साऊथच्या गाण्यात मराठी स्वॅग, 'अंगारो सा'वर केला भन्नाट डान्स

isha keskar dance on pushpa 2 song angaro sa with marathi song twist video goes viral | ईशाने फॉलो केला ट्रेंड! श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यात दाखवला मराठमोळा ठसका, व्हिडिओ एकदा पाहाच

ईशाने फॉलो केला ट्रेंड! श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यात दाखवला मराठमोळा ठसका, व्हिडिओ एकदा पाहाच

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.पुष्पानंतर या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील पुष्पा आणि श्रीवल्लीचं अंगारों सा हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'अंगारो सा' गाण्यावरील अनेक व्हिडिओने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही या गाण्यावर रील व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. आता या गाण्यावरील मराठी अभिनेत्री ईशा केसकरचा व्हिडिओ समोर आला आहे. 

ईशा केसकरने 'अंगारो सा' गाण्याचा ट्रेंड फॉलो तर केला आहे. पण, यामध्ये तिने एक ट्विस्टही दाखवला आहे. ईशाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती लाल रंगाची साडी नेसून 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. श्रीवल्लीच्या हुक स्टेपही ती या व्हिडिओत करत आहे. पण, नंतर मात्र एक लाजरान साजरा मुखडा हे मराठी गाणं सुरू होतं. आणि त्यावर ईशा डान्स करत आहे. 'अंगारो सा' आणि 'एक लाजरान साजरा मुखडा' या गाण्याच्या रिमिक्सवर ईशाने व्हिडिओ बनवला आहे. ईशाचा हा ट्रेंड विथ ट्विस्ट व्हिडिओ चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. 

ईशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे. "मराठमोळा स्वॅग विथ साऊथ इंडियन ट्विस्ट", "खूप छान", "बानू बया" अशा कमेंट्स चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर करत तिचं कौतुक केलं आहे. 

सध्या ईशा छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'जय मल्हार' या मालिकेने ईशाला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ती 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत दिसली होती. 'सरला एक कोटी', 'हॉर्न ओके प्लीज', 'शेर शिवराज', 'शिवरायांचा छावा' या सिनेमांत तिने काम केलं आहे. 
 

Web Title: isha keskar dance on pushpa 2 song angaro sa with marathi song twist video goes viral