होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये झळकणार इशा केसकर आणि विराज कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 16:35 IST2018-02-23T11:05:08+5:302018-02-23T16:35:08+5:30

अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर आता मनवा नाईक एका वेगळ्या क्षेत्राकडे वळली आहे. मनवा आता डिजिटल ...

Isha Keskar and Viraj Kulkarni will be seen in horny website | होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये झळकणार इशा केसकर आणि विराज कुलकर्णी

होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये झळकणार इशा केसकर आणि विराज कुलकर्णी

िनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर आता मनवा नाईक एका वेगळ्या क्षेत्राकडे वळली आहे. मनवा आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तिने एका वेबसिरिजची निर्मिती केली आहे. होर्न ओके प्लीज असे तिच्या वेबसिरिजचे नाव असून यात इशा केसकर आणि विराज कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहेत. इशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तिने या मालिकेत बानू ही भूमिका साकारली होती. 
होर्न ओके प्लीज या वेबसिरिजमध्ये प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ही एक अॅक्सिडेंटल लव्ह स्टोरी असून आद्विक देशपांडे आणि गायत्री बेलवलकर या दोघांची प्रेमकथा या वेबसिरिजमध्ये दाखवली जाणार आहे. आद्विक आणि गायत्री हे दोघेही आपल्या करियरच्या मागे धावत असतात. या दोघांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा असून काही कारणामुळे त्यांना एकत्र राहावे लागते. पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळेच प्लान आखलेले असते. त्यांची प्रेमकथा कशी फुलते हे होर्न ओके प्लीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
होर्न ओके प्लीज या वेबसिरिजचे डी.ओ.पी. अमोल गोळे असून त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले काम केले आहे. या वेबसिरिजचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार असून स्वप्ननील हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मनवासोबतच या वेबसिरिजची निर्मिती वृषाली शिंदे आणि शिवांगी केणी करत आहेत. 
मनवा नाईकने आजवर अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, मालिकांमध्ये काम केले आहे. मनवाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बा बहू और बेबी, तीन बहुराणीयाँ यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने जोधा अकबर या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. नो एंट्री पुढे धोका आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. अभिनयात यश मिळाल्यानंतर मनवा दिग्दर्शनाकडे वळली. तिने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे तिने केलेले दिग्दर्शन प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना देखील आवडले होते. दिग्दर्शनासोबत तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाऊल ठेवले.

Also Read : जय मल्हारमधील इशा केसकरने काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेनाला अशा खास अंदाजात दिल्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा

Web Title: Isha Keskar and Viraj Kulkarni will be seen in horny website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.