लग्नानंतर २ वर्षांतच फिस्कटलं? नवऱ्यापासून वेगळी राहते दिव्या अग्रवाल, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:38 IST2026-02-09T13:23:23+5:302026-02-09T13:38:23+5:30
दिव्या तिचा नवरा अपूर्व पाडगावकरपासून वेगळी राहत असून त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा खुलासाही भव्याने केला आहे. दिव्याच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर दिव्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

लग्नानंतर २ वर्षांतच फिस्कटलं? नवऱ्यापासून वेगळी राहते दिव्या अग्रवाल, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
रोडिज, बिग बॉस, स्प्लिट्सविला अशा रिएलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवलेली दिव्या अग्रवाल सध्या द ५० या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भव्या सिंग हिने दिव्याच्या पर्सनल लाइफबाबत मोठा दावा केला आहे. दिव्या तिचा नवरा अपूर्व पाडगावकरपासून वेगळी राहत असून त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा खुलासाही भव्याने केला आहे. दिव्याच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर दिव्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
एका टास्कदरम्यान शोमध्ये दिव्या आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर अर्चनाची मैत्रीण असलेल्या भव्याला दिव्याचा राग आला. सपना चौधरीशी बोलताना भव्याने दिव्याच्या पर्सनल लाइफबाबत काही खुलासे केले. ती म्हणाली, "ही एक नंबरची खोटी बाई आहे. लोक तिला गोल्ड डिगर का बोलतात याचं आश्चर्य वाटत नाही. मी तिला माझ्या पॉडकास्टमध्ये विचारलं होतं की तू पुन्हा रिएलिटी शो करणार का? तेव्हा तिने नाही असं म्हणत मी बिग बॉस जिंकले आहे. असं उत्तर दिलं होतं. हिने आयुष्यात काय केलंय? कधीतरी दिसण्यासाठी पीआरकडून सगळं अरेंज करून घेते. ती खोटी आहे. आणि सगळ्यांसोबत खोटं वागतेय".
"दिवाळीला तिच्या घरी फटाके फुटले होते. आणि ते फटाके मीच फोडले होते. पण मी त्याबद्दल बोलणार नाही. कारण तो तिचा पर्सनल आयुष्याचा भाग आहे. त्यांची कौटुंबिक गोष्ट होती आणि यात त्यांनी मला ओढलं. ही तिच्या पतीपासून वेगळी राहते. आणि मुंबईतल्या घरी येण्यासाठी लोकांकडे भीक मागते", असंही भव्याने सांगितलं. दिव्याने अपूर्व पाडगावकरसोबत फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. मात्र आता भव्याच्या खुलाशानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.