लग्नानंतर ३ महिन्यांतच टीव्ही अभिनेत्री प्रेग्नंट? लवकरच देणार गुडन्यूज, म्हणाली- "आम्ही यासाठी तयार नव्हतो पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:53 IST2026-01-08T11:48:39+5:302026-01-08T11:53:00+5:30
'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये अविका दिसली होती. याच शोमध्ये ऑन स्क्रीन अविकाने मिलिंद चांदवानीसोबत लग्न केलं होतं. गेल्याच वर्षी तिचा विवाहसोहळा पार पडला. आता लग्नानंतर ३ महिन्यांतच अविका गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे.

लग्नानंतर ३ महिन्यांतच टीव्ही अभिनेत्री प्रेग्नंट? लवकरच देणार गुडन्यूज, म्हणाली- "आम्ही यासाठी तयार नव्हतो पण..."
टीव्हीची 'बालिका वधू' म्हणजे अविका गौर लोकप्रिय अभिनेत्री आहे. बालिका वधू या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तिने छोट्या आनंदीची भूमिका साकारली होती. अविकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. कलर्सवरील 'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये अविका दिसली होती. याच शोमध्ये ऑन स्क्रीन अविकाने मिलिंद चांदवानीसोबत लग्न केलं होतं. गेल्याच वर्षी तिचा विवाहसोहळा पार पडला. आता लग्नानंतर ३ महिन्यांतच अविका गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे.
अविकाने पती मिलिंदसोबत नवीन व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते की २०२६ मध्ये त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. यासाठी ते दोघेही खूप उत्सुक असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. याबद्दल आम्ही कधीच स्वप्नातही विचार केला नव्हता. याची कल्पनाही केली नव्हती. पण आमच्या आयुष्यातील हा बदल खूपच छान असणार आहे, असं अविका व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर अविका तिच्या नवऱ्याला याबाबत विचारते. तेव्हा मिलिंद म्हणतो, "मी आनंदी आणि उत्साहित आहे. मी थोडा नर्व्हसही आहे. पण, आयुष्यात हेदेखील गरजेचं आहे". पुढे व्हिडीओत अविका चाहत्यांना लवकरच खूशखबर देणार असल्याचं सांगते.
अविकाच्या या व्हिडीओनंतर ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अविका आणि मिलिंद यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. टीव्हीवरच त्यांनी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. आता ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.