n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन यांसारख्या बॉलिवुडच्या दिग्गज कलाकारांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांच्यानंतर रुस्तम या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार या कार्यक्रमात येणार असल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी आली होती आणि आता बॉलिवुडच नव्हे तर हॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता इरफान खान चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात झळकणार आहे. इरफान या कार्यक्रमात मदारी या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे निशिकांत कामतचे आहे. निशिकांतही या कार्यक्रमात येणार आहे. त्याचसोबत मदारी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणारे तुषार दळवी आणि उदय टिकेकरही थुकरटवाडीत येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.