VIDEO : नवरा असावा तर असा! महिला दिनी अंकिता लोखंडेला पती विकी जैननं दिलं स्पेशल गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:45 IST2022-03-08T16:45:14+5:302022-03-08T16:45:56+5:30
Ankita Lokhande : पती विकी जैनने ( Vicky Jain )आज महिला दिनानिमित्त अंकिताला एक खास अनमोल भेट वस्तू दिली आहे. जाणून घ्या काय आहे ती खास भेट

VIDEO : नवरा असावा तर असा! महिला दिनी अंकिता लोखंडेला पती विकी जैननं दिलं स्पेशल गिफ्ट
आज जगभर महिला दिन (International Women's Day 2022 ) साजरा होतोय. बॉलिवूड आणि टीव्ही दुनियेतील स्टार्सही हा दिवस आपआपल्या अंदाजात साजरा करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) हिच्याबद्दल सांगायचं तर पती विकी जैनने ( Vicky Jain )आज अंकिताला महिला दिनानिमित्त एक खास अनमोल भेट वस्तू दिली आहे. ही खास भेटवस्तू काय आहे? यासाठी तुम्ही सोबत दिलेला व्हिडीओ बघायला हवा.
अंकिताने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला अंकिता सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. यानंतर माझा नवरा तुम्हाला काही सांगू इच्छितो, असं ती म्हणते आणि विकी बोलू लागतो. ‘तुम्हा सर्वांना हॅप्पी वूमेन डे. मी आज माझ्या पत्नीला खूप खास भेट देण्याचा विचार करतोय. आज प्रत्येक नवर्याने आपल्या बायकोला ही भेटवस्तू द्यायलाच हवी आणि ती भेट म्हणजे शांत बसणे. आज सर्व नवरे आपल्या पत्नींना काहीही म्हणणार नाही. आज सगळे शांत बसतील. ती जे काही करेल, ते तिला करू देतील आणि ती म्हणेल तेच ऐकतील,’ असं तो म्हणतो.
आता इतकं खास गिफ्ट मिळाल्यावर कोणत्या बायकोला आनंद होणार नाही? अंकिता खुश्श होते. क्या बात है. याला म्हणतात नवरा, जो फक्त बायकोचं ऐकतो, असं ती म्हणते. अंकिता लोखंडे काही महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाह बंधनात अडकली. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या शाही लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.