'शिवा'मध्ये रंजक वळण, आशुने उचललेल्या पावलामुळे शिवा आणि त्याच्या नात्यात येईल का गोडवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:36 IST2024-08-13T13:36:13+5:302024-08-13T13:36:48+5:30
'शिवा' मालिका (Shiva Serial) सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे.

'शिवा'मध्ये रंजक वळण, आशुने उचललेल्या पावलामुळे शिवा आणि त्याच्या नात्यात येईल का गोडवा?
'शिवा' मालिका (Shiva Serial) सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. आशू आणि शिवा देसाई घरी पोहोचतात. वस्तीत आणि शिवाच्या घरच्यांनी आशूचा खूप प्रेमाने त्याचा पाहुणचार केल्यामुळे त्याला घटस्पोटाचा विषय काढता येत नाही असं तो सिताईला सांगतो. सिताई शिवाला तिच्या वचनाची आठवण करून देते आणि आशुला घटस्फोट दे असं सांगते. शिवाला या सगळ्याच खूप वाईट वाटतं. शिवा आशुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेते.
सिताईच्या हातात सह्या केलेले पेपर देताना शिवा येत्या सहा महिन्यात देसाई घराण्याची सून म्हणून स्वतःला सिद्ध करेन असे चॅलेंज देते. घरी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शिवा नैवेद्याचे दिंड बनवण्याचे ठरवते. सीताई उर्मिलाला शिवाला मदत न करण्याचा सल्ला देते. शिवा एकदम वेगळ्याच रंगात आणि ढंगात वावरत असते. शिवा पुरणाची दिंड खूप उत्कृष्ट बनवते. यावरून सीताईला वाटते तिला नक्कीच कोणीतरी मदत केली असेल. दिंड खराब करण्याचा कीर्ती प्लॅन बनवते. पण शिवा तो प्लान तिच्यावरच उलटवून लावते. उर्मिला सिताईच्या डोक्याला तेल लावत असताना शिवा हळूच येते आणि स्वतःहून सिताईच्या डोक्याला तेल लावते हे जेंव्हा सिताईच्या लक्षात येतं तेव्हा सिताई नाराज होते. एकूणच काय तर शिवा एक परिपूर्ण सुनेसारखी वागायला लागल्याचे दिसून येतेय.
देसाईंच्या घरात शिवाची मंगळागौर साजरी करण्याची लगबग सुरु होते. मंगळागौरीच्या कार्यक्रमात सिताई, शिवा आणि सगळ्या बायका मिळून फुगडी खेळतात. जगदीशची म्हणजेच शिवाच्या काकाची बायको वेळ मिळताच सिताईला शिवाने आमचे घर बळकावलं आहे असं सांगते. यावरून सिताई शिवाला जाब विचारायला जाते तेव्हा आशू शिवाची बाजू घेऊन जगदीश काका खूप कट कारस्थानी असल्याचं सांगतो. शिवासाठी, आशुने घेतलेलं हे पाऊल त्यांच्या नात्यात गोडवा आणेल का? 'शिवा'चा महाएपिसोड १८ ऑगस्टला रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहायला मिळेल.