"...आणि प्रवास संपला", २ वर्षांनी 'इंद्रायणी' घेणार निरोप, प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:52 IST2026-02-23T15:52:22+5:302026-02-23T15:52:57+5:30

गेल्या दोन वर्षांपासून कलर्स मराठीवरील ही मालिका  प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र आता 'इंद्रायणी' मालिका आणि प्रेक्षकांची लाडकी इंदू निरोप घेत आहे. 

indrayani serial will go off air actress kanchi shinde shared emotional post | "...आणि प्रवास संपला", २ वर्षांनी 'इंद्रायणी' घेणार निरोप, प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूची भावुक पोस्ट

"...आणि प्रवास संपला", २ वर्षांनी 'इंद्रायणी' घेणार निरोप, प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूची भावुक पोस्ट

'इंद्रायणी' या मालिकेने अल्पावधतीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील छोटी इंदू प्रेक्षकांना फारच आवडली होती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मोठ्या इंदूचा प्रवासही यातून दाखवला गेला होता. गेल्या दोन वर्षांपासून कलर्स मराठीवरील ही मालिका  प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र आता 'इंद्रायणी' मालिका आणि प्रेक्षकांची लाडकी इंदू निरोप घेत आहे. 

'इंद्रायणी' मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट करण्यात आला. मालिकेचं शूटिंग संपल्यानंतर इंदू नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कांची शिंदे हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग सेटवरील काही फोटो कांचीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. "...आणि इंद्रायणीचा प्रवास संपला", असं कॅप्शन कांचीने या फोटोंना दिलं आहे. २१ फेब्रुवारीला या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग झालं. मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रसारित केला जाईल. 


'इंद्रायणी' मालिका निरोप घेत असल्याने चाहते नाराज झाले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. 'इंद्रायणी' मालिकेत छोट्या इंदूची भूमिका सांची भोयर हिने साकारली होती. तर मोठ्या इंदूच्या भूमिकेत कांची शिंदे दिसली. त्याशिवाय स्वानंद बर्वे, संदीप पाठक, अंकिता दाते केळकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

Web Title: indrayani serial will go off air actress kanchi shinde shared emotional post