'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..."

By कोमल खांबे | Updated: April 2, 2026 12:44 IST2026-04-02T12:42:20+5:302026-04-02T12:44:17+5:30

'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी घरी आणली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

indrayani fame actor nishant pawar buys his first new car shared post | 'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..."

'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने घेतली पहिली गाडी, आनंद गगनात मावेना, म्हणाला- "पप्पा म्हणायचे..."

आपली स्वत:ची गाडी असावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या स्वप्नातील गाडी खरेदी करतात. एका मराठी अभिनेत्यानेही त्याचं गाडीचं स्वप्न पूर्ण केलं आहे. 'इंद्रायणी' फेम अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी घरी आणली आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'इंद्रायणी' मालिकेत अधोक्षजची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता निशांत पवार आहे. 

निशांतने गाडीचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने छान कॅप्शनही दिलं आहे. "पप्पा म्हणायचे स्वतः कमव, स्वतः घे. आज स्वामींच्या आशिर्वादामुळे आणि आई-वडिलांच्या पुण्याईमुळे मी त्यांचं आणि माझं हे स्वप्न पूर्ण करू शकलो", असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे. 


निशांतने नव्या कारसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. निशांकने टाटा कंपनीची गाडी खरेदी केली आहे.  Tata Nexon SUV ही गाडी त्याने घरी आणली आहे. या गाडीची किंमत सुमारे ८-१० लाख इतकी आहे. निशांतच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी त्याचं अभिनंदन केलं आहे. 


दरम्यान, निशांतची मुख्य भूमिका असलेल्या 'इंद्रायणी' या मालिकेने नुकतंच निरोप घेतला आहे. ही मालिका कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत कांची शिंदेने इंदूची भूमिका साकारली होती. जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

Web Title : 'इंद्रायणी' फेम अभिनेता ने खरीदी पहली कार, पिता की बात आई याद

Web Summary : 'इंद्रायणी' से मशहूर निशांत पवार ने टाटा नेक्सन एसयूवी कार खरीदी। उन्होंने इस उपलब्धि को अपने माता-पिता को समर्पित किया और पिता के प्रोत्साहन को याद किया। निशांत ने सोशल मीडिया पर खुशी साझा की।

Web Title : 'Indrayani' fame actor buys first car; overjoyed, recalls father's words.

Web Summary : Nishant Pawar, known for 'Indrayani,' fulfilled his dream of buying a car, a Tata Nexon SUV. He dedicated this achievement to his parents, recalling his father's encouragement to earn and acquire possessions independently. The actor shared his joy on social media.